येत्या रविवारी असणाऱ्या #NationalParentsDay च्या निमित्ताने; पालकांमध्ये खूप उत्कंठा आणि उत्सुकता असणाऱ्या आणि बरेचदा ज्याची खूप धास्तीदेखील मनात असते अशा "होमस्कूलिंग" या संकल्पनेवर आधारीत असणाऱ्या आजच्या या भागात आपल्याबरोबर असणारे ; स्वतःच्या मुलीचं पहिली ते दहावी होमस्कूलिंग केलेली एक हरहुन्नरी पालक, निलीमा देशपांडे !!! मुळात होमस्कूलिंग म्हणजे नेमकं काय ? या अगदी बेसिक प्रश्नापासून ते; तो स्विकारायची तयारी कशी करायची? त्यासाठी कुठल्या महत्वाच्या गोष्टींचा विचार करणं गरजेचं आहे ? कोणाची मदत घेता येते का? त्याच्या पद्धती कोणत्या ? या पद्धतीचे फायदे आणि तोटे काय असतात ? अशा बऱ्याच गोष्टी नीलिमाकडून आज आपण जाणून घेणार आहोत !! आणि हो , cherry on the top म्हणजे हा संपूर्ण प्रयोग जिच्यावर झाला तिचं या प्रवासाविषयी काय मत आहे? हे जाणून घेण्यासाठी; तिच्या मुलीशी, जान्हवीशीसुद्धा आपण बोलणार आहोत !!! अर्थात या प्रवासात तिचे बाबा ऋतुराज यांचाही खूप सक्रिय सहभाग आहेच, पण कामाच्या व्यवधानातून त्यांना वेळ काढणं जमलं नाही पण त्यांना आपण एका वेगळ्या प्रकारे भेटू शकतो ..कसं ? ते episode पूर्ण ऐकल्यावर कळेलच !!! चला तर मग ऐकूया #HOMESCHOOLING या पध्दतीने प्रदीर्घ काळ शिकवलेल्या आणि शिकलेल्या एका हरहुन्नरी पालक आणि मुलीच्या अनुभवाचे बोल सांगणारा Selfless Parenting चा नवाकोरा एपिसोड !!!

family,parents,