आज आपण अशा एका विषयावर बोलणार आहोत, ज्याबद्दल आपण खूपदा बोलतो. खूपदा ते पदार्थ विकत आणतो, बनवतो, खातो. त्यातल्या काहींबद्दल आपल्याला खरीखुरी काळजी वाटते. तर काही पदार्थ तसे आहेत हे लक्षातदेखील येत नाही. ते म्हणजे प्रक्रियायुक्त पदार्थ. ते फक्त दुकानातल्या रॅकमधूनच आपल्या घरी येत नाहीत आणि ते सगळे सरसकट अपायकारकही नसतात. निसर्गोपचारात नेहमी म्हटलं जातं की नैसर्गिक अन्न खायचं, प्रक्रियायुक्त खायचं नाही. आज २०२२ सालात कसं पाळायचं हे? जिभेचे लाड पुरवावेसे वाटतातच. धावपळीच्या, दूर अंतरांच्या, गुंतागुंतीच्या जीवनशैलीत फक्त कच्चं खाणं शक्य वाटत नाही. मग काय नेहमी अपराधी वाटून घेत नाहीतर काळजी करत नाहीतर बेदरकारपणे ‘जाऊ दे मरू दे’ म्हणत खायचं?

प्रकृती मध्ये सहभागी व्हायचंय?
तुमच्या प्रश्नांचं प्रकृती मध्ये स्वागत आहे. निसर्गोपचाराशी संबंधित काहीही प्रश्न, शंका विचारायचे असतील तर खाली दिलेल्या व्हॉइस मेसेज वरून आम्हाला जरूर विचारा.
 तुमचं नाव गाव सांगून मग तुमचा प्रश्न विचारा. https://audiowallah.com/prakruti

प्रकृतीपर्यंत पोचणं आता अधिक सोपं. फक्त या लिंकवर क्लिक करा, आणि तुमचा व्हॉइस मेसेज रेकॉर्ड करा. तुमचं नाव आणि गाव आधी सांगायला विसरू नका. https://audiowallah.com/prakruti

तुमचा अभिप्राय, प्रश्न, शंका, सूचना,अनुभव जरूर कळवा. रेकॉर्ड करा किंवा माझ्या फेसबुक पेजवर किंवा इन्स्टा पेज वर. https://www.facebook.com/vidula.tokekar https://www.instagram.com/vidulatokekar/?hl=en 

#processedfood,#naturopaty,#foodchoice,#novaclassification,#shrutkeerti,#translationpanacea,#kelkarhealthsolutions,