ब्र- ब्रेकफास्टचा Breakfast, the Natural way

ब्र- ब्रेकफास्टचा Breakfast, the Natural way

What is the real 'Kinglike Breakfast', How to start the day with the nutritious, quick, tasty and natural first meal?

दिवसातलं पहिलं अन्न खाणं म्हणजे न्याहारी किंवा ब्रेकफास्ट. तो सर्वात चांगला असला पाहिजे. काय बरं सगळ्यात पौष्टिक, झटपट, नैसर्गिक, चविष्ट खावं ब्रेकफास्टला? अस्सा मस्त ब्रेकफास्ट करा की दिवस छान जाणारच!

निसर्गोपचार तज्ज्ञ माधवी गोखले उत्तम ब्रेकफास्टचं रहस्य उलगडून सांगत आहेत प्रकृती च्या या भागात- ब्र ब्रेकफास्टचा.

पाककृती - फ्रूट क्रम्बल (मायावी खंडेलवाल, मुंबई यांना धन्यवाद!)

साहित्य - 

अननसाचे तीन चार काप, बारीक तुकडे करून, १ मोठं सफरचंद आणि २ केळी बारीक चौकोनी तुकडे करून, अर्धी वाटी डाळिंबाचे दाणे, पाव कप बेदाणे ऐच्छिक, थोडास्सा लिंबाचा रस चवीसाठी.

६ चमचे बदामाची भरड पूड, ८ टेबलस्पून खारीक पूड, ५ टेबलस्पून किसलेलं सुकं खोबरं.

क्रीमसाठी शहाळ्याची मलई अगदी थोडं पाणी घालून मिक्सरवर फिरवून घ्या. पाव कम बेदाणे भिजवून वाटून घ्या.

कृती - सगळी फळं आणि लिंबाचा रस एकत्र मिसळा. त्यात बाकीचे कोरड्या वस्तूही घाला.छान मिसळा. एका पसरट काचेच्या ट्रेमध्ये फळं पसरा. ते पूर्ण झाकलं जाईल असं त्यावर सुकं मिश्रण म्हणजे बदाम, खारीक, खोबरं यांची पूड पसरा. क्रीम तयार करण्यासाठी शहाळ्याची पेस्ट आणि बेदाण्याची पेस्ट एकत्र मिसळा.

What is the best menu for the most important meal of the day? What is that is nourishing, quick, tasty and natural? Here we bring you the breakfast that is guaranteed to liven up your day!

Madhavi Gokhale, the practising naturopath reveals the secret of 'Breakfast like a King!' 

Recipe - Fruit Crumble - Thanks to Mayavi Khandelwal, Mumbai.

Ingredients - 3/4 slices of pineapple cut into small pieces, 1 apple and 2 bananas cut into small squares, half cup pomgranate seeds, 1/4 cup kismis optional, lemon juice to taste.

6 spoons coarsely crushed almonds, 6 tbl sp Kharik powder, 5 tbl sp grated dried coconut.

for cream - blend tender coconut with a little water. Add to it soaked and blended kismis 1/4 cup.

 Recipe - Mix all fruits well. spread them on a shallow tray. Cover with the mixture of powders. 

Serve in a bowl, Top is up with the cream.

प्रकृती मध्ये सहभागी व्हायचंय?
तुमच्या प्रश्नांचं प्रकृती मध्ये स्वागत आहे. निसर्गोपचाराशी संबंधित काहीही प्रश्न, शंका विचारायचे असतील तर खाली दिलेल्या व्हॉइस मेसेज वरून आम्हाला जरूर विचारा.
 तुमचं नाव गाव सांगून मग तुमचा प्रश्न विचारा. https://audiowallah.com/prakruti

प्रकृतीपर्यंत पोचणं आता अधिक सोपं. फक्त या लिंकवर क्लिक करा, आणि तुमचा व्हॉइस मेसेज रेकॉर्ड करा. तुमचं नाव आणि गाव आधी सांगायला विसरू नका. https://audiowallah.com/prakruti

तुमचा अभिप्राय, प्रश्न, शंका, सूचना,अनुभव जरूर कळवा. रेकॉर्ड करा किंवा माझ्या फेसबुक पेजवर किंवा इन्स्टा पेज वर https://www.facebook.com/vidula.tokekar or https://www.instagram.com/vidulatokekar/?hl=en 

 

#breakfast,#naturopathy,#firstmeal,#shrutkeerti,#TranslationPanacea,#khs,