१७१७ साल उजाडले... खंडेराव दाभाडे आणि मराठ्यांच्या गनिमी काव्याने मुघल सुभेदार सय्यद हुसेन अली पार जेरीस आला होता. त्याला कळून चुकले होते की या सह्याद्रीच्या वाघांना युद्धात हरवणे अशक्य आहे. त्याच वेळी दिल्लीच्या तख्तावर बादशहा फर्रुखसियर सय्यद बंधूंना मारण्याचे भयंकर कट रचत होता. स्वतःचा जीव वाचवण्यासाठी हुसेन अलीने अखेर मराठ्यांकडेच मदतीची याचना केली! हीच ती ऐतिहासिक वेळ... पेशवे बाळाजी विश्वनाथ यांनी आपला सर्वात मोठा मुत्सद्दी डाव टाकला. त्यांनी हुसेन अलीसमोर स्वराज्याच्या मान्यतेच्या, आणि ३० वर्षांपासून कैदेत असलेल्या शाहू महाराजांच्या मातोश्री येसूबाई यांच्या सुटकेच्या अटी आक्रमकपणे ठेवल्या! मरता क्या न करता? हुसेन अलीने या सर्व अटी मान्य केल्या. आणि नोव्हेंबर १७१८ मध्ये... १५ हजार मराठ्यांची भयंकर फौज घेऊन बाळाजी विश्वनाथ दिल्लीच्या दिशेने निघाले! त्यांच्याच सोबत होता अवघ्या १८ वर्षांचा सळसळत्या रक्ताचा तरुण बाजीराव... ज्या दिल्लीने आजवर मराठ्यांना फक्त मृत्यू आणि वेदना दिल्या होत्या, त्याच दिल्लीच्या छाताडावर चालून जाण्याची ही पहिलीच वेळ होती. शत्रूच्याच मदतीने त्याच्याच राजधानीवर चालून जाण्याचा हा मराठ्यांचा स्वॅग खरोखरच अफाट होता! संपूर्ण हिंदुस्थान हादरून गेला होता. पण... दिल्लीच्या त्या अरुंद आणि काळोख्या रस्त्यांवर बाजीरावासाठी एक रक्तरंजित आणि भयानक खेळ शिजत होता... मुघल साम्राज्य काय करणार होते? ... [Music Fades Out]...
Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices