EP 4 : आयर्नमॅन स्पर्धेत अव्वल ठरलेल्या पुणेकर सीएचा फिटनेस प्रवास

EP 4 : आयर्नमॅन स्पर्धेत अव्वल ठरलेल्या पुणेकर सीएचा फिटनेस प्रवास

व्यवसायाने बँकर,सीए असलेल्या सायली गंगाखेडकर यांनी आयर्न मॅनसारखी फिटनेस जगतातील अत्यंत मानाची समजली जाणारी स्पर्धा उत्तम टायमिंगसह पूर्ण केली. बाळंतपणात वाढलेलं वजन, मल्टीनॅशनलमधलं काम आणि घर याची सांगड सायलीने कशी घातली, तिचा हा फिटनेस प्रवास ऐकणार आहोत, आजच्या सकाळ तनिष्का पॉडाकास्टमध्ये.
तब्बल २२ वर्षांनंतर सायलीने आपल्यातली फिटनेस फ्रीक मुलगी कशी बाहेर काढली, आयर्नमॅन शर्यतीसाठी सायकल चालवण्याबरोबरच ती दुरुस्त करण्याचंही ती कसं शिकली या सगळ्याबद्दल तिला बोलतं केलं आहे, स्वाती केतकर-पंडित यांनी