रंगीत कोल्हा

रंगीत कोल्हा

कोण्या एका जंगलात चंडरव नावाचा एक कोल्हा राहात हवा. तो एकदा भुकेने व्याकूळ होऊन अन्नाच्या शोधात एका नगरात जाऊन पोचला. नगरातले कुत्रे त्याला पाहून भुंकत भुंकत त्याच्या मागे धावू लागले. त्यांच्यापासून आपला जीव वाचवण्यासाठी तो कोल्हा धावत धावत एका धोब्याच्या घरात घुसला. तिथे निळीच्या पाण्याने भरलेला हौद होता. घाबरलेला कुत्रा गडबडीत त्या हौदात पडला. जेव्हा तो हौदातून बाहेर आला तेव्हा त्याचा रंग निळा झाल्यामुळे कुत्रे त्याला ओळखू शकले नाहीत आणि त्यांनी त्याची पाठ सोडली. निळ्या रंगात रंगलेला कोल्हा हळूहळू जंगलात पोचला. जंगलातले सगळे प्राणी रंगीत कोल्हा पाहून आश्चर्यचकित झाले आणि घाबरून इकडे तिकडे पळू लागले. इतकंच तर मोठमोठे हत्ती आणि भयानक सिंहदेखील या नव्या प्राण्यामुळे घाबरून गेले. त्यांना घाबरून गेलेलं पाहून चंडरव म्हणाला, "हे जंगली प्राण्यांनो तुम्ही मला बघून का पळून जाताय? मला घाबरू नका. ब्रह्मदेवांनी आजच माझी निर्मिती केली आहे आणि मला जंगलातल्या सर्व प्राण्यांचा राजा बनवून इथे पाठवले आहे. माझं नाव ककुद्द्रुम आहे, आणि साक्षात ब्रह्मदेवाच्या आज्ञेनुसार मी तुम्हा सर्वांचा राजा आहे. त्याचं बोलणं ऐकून सर्व प्राणी म्हणाले, "आज्ञा द्या महाराज!"

कोण्या एका जंगलात चंडरव नावाचा एक कोल्हा राहात हवा. तो एकदा भुकेने व्याकूळ होऊन अन्नाच्या शोधात एका नगरात जाऊन पोचला. नगरातले कुत्रे त्याला पाहून भुंकत भुंकत त्याच्या मागे धावू लागले. त्यांच्यापासून आपला जीव वाचवण्यासाठी तो कोल्हा धावत धावत एका धोब्याच्या घरात घुसला. तिथे निळीच्या पाण्याने भरलेला हौद होता. घाबरलेला कुत्रा गडबडीत त्या हौदात पडला. जेव्हा तो हौदातून बाहेर आला तेव्हा त्याचा रंग निळा झाल्यामुळे कुत्रे त्याला ओळखू शकले नाहीत आणि त्यांनी त्याची पाठ सोडली. निळ्या रंगात रंगलेला कोल्हा हळूहळू जंगलात पोचला.

जंगलातले सगळे प्राणी रंगीत कोल्हा पाहून आश्चर्यचकित झाले आणि घाबरून इकडे तिकडे पळू लागले. इतकंच तर मोठमोठे हत्ती आणि भयानक सिंहदेखील या नव्या प्राण्यामुळे घाबरून गेले. त्यांना घाबरून गेलेलं पाहून चंडरव म्हणाला, "हे जंगली प्राण्यांनो तुम्ही मला बघून का पळून जाताय? मला घाबरू नका. ब्रह्मदेवांनी आजच माझी निर्मिती केली आहे आणि मला जंगलातल्या सर्व प्राण्यांचा राजा बनवून इथे पाठवले आहे. माझं नाव ककुद्द्रुम आहे, आणि साक्षात ब्रह्मदेवाच्या आज्ञेनुसार मी तुम्हा सर्वांचा राजा आहे. 

त्याचं बोलणं ऐकून सर्व प्राणी म्हणाले, "आज्ञा द्या महाराज!"