मूर्ख बगळाआणि खेकडा

मूर्ख बगळाआणि खेकडा

मूर्ख बगळाआणि खेकडा कुण्या एका जंगलात एका झाडावर अनेक बगळे राहत होते. त्याच झाडाच्या ढोलीत एक काळा भयानक साप रहात होता. तो पंख न फुटलेल्या बगळ्याच्या पिल्लांना खाऊन टाकत असे. एकदा तो बगळा साप आपल्या पिल्लांना खाऊन टाकतोय हे बघून दुःखी झालेला बगळा नदी किनारी गेला आणि पाणी भरल्या डोळ्यांनी मान खाली घालून बसला. त्याला असं पाहून खेकडा त्याच्या जवळ जाऊन म्हणाला,"मामा! काय झालं?आज तू का रडतो आहेस? बगळा म्हणाला,"भद्रा! काय करू, झाडाच्या ढोलीत राहणार्‍या सापानी मा पामराचं पिल्लू खाऊन टाकलं. ह्याच कारणाने मी दुःखात आसवं गाळतो आहे. त्या सापाला नष्ट करायचा काही उपाय असेल तर सांग." त्याचं बोलणं ऐकून खेकड्याने विचार केला हा तर माझा शत्रू आहे, ह्याला असं काही उपाय सांगतो की ह्याची उरली सुरली पिल्लंही नष्ट होतील." असा विचार करून तो म्हणाला,"मामा! जर असं असेल तर तू माश्याचे तुकडे मुंगसाच्या बिळापासून ते सापाच्या ढोलीपर्यंत टाकून दे. असं केल्याने मुंगस त्या मार्गाने जाऊन सापाला मारून टाकेल. बगळ्याने तेच केलं. माश्याचे तुकडे खात खात मुंगूस सापाच्या ढोलीपर्यंत गेला आणि त्या सापाला मारून टाकलं. सापाला मारल्यानंतर मुंगूसाने एक एक करत झाडावर राहणार्‍या बगळ्यांनाहि खाऊन टाकलं. म्हणूनच म्हणतात कुठलीही ऊपाय योजना करतांना त्याच्या परिणामाचाही विचार करावा.

मूर्ख बगळाआणि खेकडा

कुण्या एका जंगलात एका झाडावर अनेक बगळे राहत होते. त्याच झाडाच्या ढोलीत एक काळा भयानक साप रहात होता. तो पंख न फुटलेल्या बगळ्याच्या पिल्लांना खाऊन टाकत असे. एकदा तो बगळा साप आपल्या पिल्लांना खाऊन टाकतोय हे बघून दुःखी झालेला बगळा नदी किनारी गेला आणि पाणी भरल्या डोळ्यांनी मान खाली घालून बसला. 

त्याला असं पाहून खेकडा त्याच्या जवळ जाऊन म्हणाला,"मामा! काय झालं?आज तू का रडतो आहेस? बगळा म्हणाला,"भद्रा! काय करू, झाडाच्या ढोलीत राहणार्‍या सापानी मा पामराचं पिल्लू खाऊन टाकलं. ह्याच कारणाने मी दुःखात आसवं गाळतो आहे. त्या सापाला नष्ट करायचा काही उपाय असेल तर सांग."

त्याचं बोलणं ऐकून खेकड्याने विचार केला हा तर माझा शत्रू आहे, ह्याला असं काही उपाय सांगतो की ह्याची उरली सुरली पिल्लंही नष्ट होतील." असा विचार करून तो म्हणाला,"मामा! जर असं असेल तर तू माश्याचे तुकडे मुंगसाच्या बिळापासून ते सापाच्या ढोलीपर्यंत टाकून दे. असं केल्याने मुंगस त्या मार्गाने जाऊन सापाला मारून टाकेल. 

बगळ्याने तेच केलं. माश्याचे तुकडे खात खात मुंगूस सापाच्या ढोलीपर्यंत गेला आणि त्या सापाला मारून टाकलं. सापाला मारल्यानंतर मुंगूसाने एक एक करत झाडावर राहणार्‍या बगळ्यांनाहि खाऊन टाकलं.

म्हणूनच म्हणतात कुठलीही ऊपाय योजना करतांना त्याच्या परिणामाचाही विचार करावा.