धूर्त बगळ्याची कहाणी

धूर्त बगळ्याची कहाणी

कोण्या एका जंगलात अनेक जलचरांनी भरलेला एक तलाव होता. तिथे राहणारा एक बगळा म्हातारा झाल्यामुळे त्याला आजकाल मासे पकडता येत नसत. भुकेने व्याकूळ झाल्यामुळे तो नदीकाठी बसून आसवं गाळत रडत बसला होता. त्याच वेळी त्याला एका खेकड्याने रडताना पाहिलं आणि कुतूहल आणि सहानभूती पोटी विचारलं, "मामा! आज तुम्ही तुमच्या भोजनाचा शोध घेण्याचं सोडून इथे रडत का बसला आहात?" बगळा म्हणाला, "खरंय तुझं. मासे खाऊन मला आता वैराग्य आलं आहे. आता मी आमरण उपोषण सुरू केलं आहे." खेकड्याने विचारलं, "काय हो मामा पण तुमच्या या वैराग्याचं नेमकं कारण काय?" बगळा म्हणाला, " अरे याच तळ्यातला माझा जन्म आणि इथेच मी म्हातारा झालो. पण आजच मी ऐकलंय की पुढच्या बारा वर्षात पाऊसच पडणार नाहीये. त्यामुळे आता हा तलाव आटून जाईल आणि इथे राहणार्‍या सर्व प्राण्यांवर मृत्यूचे संकट ओढवणार आहे. म्हणूनच मी दुःखी आहे." खेकड्याने सगळ्या जलचरांना ही बातमी सांगितली. भीतीने घाबरगुंडी उडलेले ते सगळे बगळ्यापाशी आले आणि एका स्वरात म्हणाले, "मामा आमचा जीव वाचवण्याचा काही उपाय आहे का?" बगळा म्हणला, "या तलावापासून काही अंतरावर एक खूप मोठा तलाव आहे. त्यात इतकं पाणी आहे, की बारा वर्षच काय चौवीस वर्ष जरी पाऊस पडला नाही तरी त्यातलं पाणी अटणार नाही. जर तुमची इच्छा असेल तर एकेक करून मी तुम्हा सगळ्यांना त्या तलावात नेऊन सोडेन." अशा प्रकारे बगळा रोज काही मासे तलावातून घेऊन जात असे आणि त्यांना एका खडकावर नेऊन फस्त करत असे. असं अनेक दिवस चाललं आणि धूर्त बगळ्याला विना कष्ट भरपेट भोजन मिळत राहिलं. एके दिवशी न राहून खेकडा बगळ्याला म्हणाला, "मामा तुमच्याशी सगळ्यात पहिल्यांदा तर मी बोललो होतो आणि अजून पर्यंत तुम्ही मलाच त्या तळ्यात सोडलं नाही. तुम्ही कृपा करून माझ्याही प्राणांचं रक्षण करा." दुष्ट बगळ्याने विचार केला, "रोज रोज मासे खाऊन मलाही आता कंटाळा आलाय. आज या खेकड्यालाच खाऊन टाकतो. असा मनात विचार करून त्याने त्या खेकड्याला आपल्या पाठीवर बसवलं आणि खडकाच्या दिशेने तो उडू लागला. खेकड्याला दूरवरून माशांच्या हाडाचा ढीग दिसला. तो पाहून तो घाबरला आणि बगळ्याला म्हणाला, "मामा तो दूसरा तलाव किती लांब आहे? मला एवढावेळ तुमच्या पाठीवर बसवून तुम्ही आता दमला असाल नं!" बगळ्याने विचार केला, "पाण्यात राहणारा हा खेकडा हा माझं काय वाकडं करणार!" आणि म्हणाला, "अरे खेकड्या दूसरा तलाव वगैरे काही नाहीये. इथे मी माझ्या भोजनाची सोय लावून घेतली आहे आणि आजचं माझं भोजन आहेस तू!" बगळ्याचं हे बोलणं ऐकताक्षणी खेकड्याने आपल्या नांग्यामध्ये त्याची मान आवळली आणि त्यामुळे तो दुष्ट बगळा मरण पावला. बगळा मेल्यावर खेकडा हळूहळू तलावापाशी आला आणि इतरांना त्याने त्या धूर्त बगळयाच्या कावेबाजपणाविषयी सांगून टाकलं. म्हणूनच म्हणतात, कधीही चंचलवृतीने गरजे पेक्षा अधिक बडबड करू नये.

कोण्या एका जंगलात अनेक जलचरांनी भरलेला एक तलाव होता. तिथे राहणारा एक बगळा म्हातारा झाल्यामुळे त्याला आजकाल मासे पकडता येत नसत. भुकेने व्याकूळ झाल्यामुळे तो नदीकाठी बसून आसवं गाळत रडत बसला होता. त्याच वेळी त्याला एका खेकड्याने रडताना पाहिलं आणि कुतूहल आणि सहानभूती पोटी विचारलं, "मामा! आज तुम्ही तुमच्या भोजनाचा शोध घेण्याचं सोडून इथे रडत का बसला आहात?"

बगळा म्हणाला, "खरंय तुझं. मासे खाऊन मला आता वैराग्य आलं आहे. आता मी आमरण उपोषण सुरू केलं आहे."

खेकड्याने विचारलं, "काय हो मामा पण तुमच्या या वैराग्याचं नेमकं कारण काय?"

बगळा म्हणाला, " अरे याच तळ्यातला माझा जन्म आणि इथेच मी म्हातारा झालो. पण आजच मी ऐकलंय की पुढच्या बारा वर्षात पाऊसच पडणार नाहीये. त्यामुळे आता हा तलाव आटून जाईल आणि इथे राहणार्‍या सर्व प्राण्यांवर मृत्यूचे संकट ओढवणार आहे. म्हणूनच मी दुःखी आहे." 

खेकड्याने सगळ्या जलचरांना ही बातमी सांगितली. भीतीने घाबरगुंडी उडलेले ते सगळे बगळ्यापाशी आले आणि एका स्वरात म्हणाले, "मामा आमचा जीव वाचवण्याचा काही उपाय आहे का?" बगळा म्हणला, "या तलावापासून काही अंतरावर एक खूप मोठा तलाव आहे. त्यात इतकं पाणी आहे, की बारा वर्षच काय चौवीस वर्ष जरी पाऊस पडला नाही तरी त्यातलं पाणी अटणार नाही. जर तुमची इच्छा असेल तर एकेक करून मी तुम्हा सगळ्यांना त्या तलावात नेऊन सोडेन." 

अशा प्रकारे बगळा रोज काही मासे तलावातून घेऊन जात असे आणि त्यांना एका खडकावर नेऊन फस्त करत असे. असं अनेक दिवस चाललं आणि धूर्त बगळ्याला विना कष्ट भरपेट भोजन मिळत राहिलं. 

एके दिवशी न राहून खेकडा बगळ्याला म्हणाला, "मामा तुमच्याशी सगळ्यात पहिल्यांदा तर मी बोललो होतो आणि अजून पर्यंत तुम्ही मलाच त्या तळ्यात सोडलं नाही. तुम्ही कृपा करून माझ्याही प्राणांचं रक्षण करा." 

दुष्ट बगळ्याने विचार केला, "रोज रोज मासे खाऊन मलाही आता कंटाळा आलाय. आज या खेकड्यालाच खाऊन टाकतो. असा मनात विचार करून त्याने त्या खेकड्याला आपल्या पाठीवर बसवलं आणि खडकाच्या दिशेने तो उडू लागला. 

खेकड्याला दूरवरून माशांच्या हाडाचा ढीग दिसला. तो पाहून तो घाबरला आणि बगळ्याला म्हणाला, "मामा तो दूसरा तलाव किती लांब आहे? मला एवढावेळ तुमच्या पाठीवर बसवून तुम्ही आता दमला असाल नं!"

बगळ्याने विचार केला, "पाण्यात राहणारा हा खेकडा हा माझं काय वाकडं करणार!" आणि म्हणाला, "अरे खेकड्या दूसरा तलाव वगैरे काही नाहीये. इथे मी माझ्या भोजनाची सोय लावून घेतली आहे आणि आजचं माझं भोजन आहेस तू!" 

बगळ्याचं हे बोलणं ऐकताक्षणी खेकड्याने आपल्या नांग्यामध्ये त्याची मान आवळली आणि त्यामुळे तो दुष्ट बगळा मरण पावला. 

बगळा मेल्यावर खेकडा हळूहळू तलावापाशी आला आणि इतरांना त्याने त्या धूर्त बगळयाच्या कावेबाजपणाविषयी सांगून टाकलं. 

म्हणूनच म्हणतात, कधीही चंचलवृतीने गरजे पेक्षा अधिक बडबड करू नये.