एपिसोड  ४६ -  मुक्ता चैतन्य ( लेखक, पत्रकार ) 


Screen Time 



आजकाल रात्री आपण झोपतो सगळे इंस्टाग्राम रील्स बघून झाले की, गेम च्या सगळ्या लाईफ संपल्याकी, सोशल मीडिया वर फारसा बघायचं काही राहिलं नाही की. झोप आली किंव्हा अमुक एक वेळ झाली म्हणून आपलं झोपणं आता बंद झालं आहे का?


हे आपल्या बाबतीत किंव्हा आपल्या जवळच्या कोणाच्या बाबतीत होतं आहे का ?


आपण स्क्रीन च्या आहारी गेलो आहोत का? 


आपल्याला वाटतं त्या पेक्षा नक्कीच आपण त्याच्या आहारी गेलो आहोत.. 


जरी ह्यातून कुठल्याच वयाचे लोकं सुटले नाहीत तरी  सगळ्यात जास्त परिणाम होतो आहे teenagers आणि कॉलेज स्टुडंट्स वर.  


गेम खेळणं, सोशल मीडिया वर चाट करणे, त्या साठी जागरण करणे, मग घरचे झोपले हे पाहून पॉर्न साईट explore करणे असे सगळे प्रकार घरो घरी होतोत. 

प्रत्येकाला असंच वाटतं की आपलं मुलं अजूनही निरागस आहे आणि अजून तो किंवा ती असं काही करत नसेल. 


आपण आपल्याला वाटतं तसं ते नसतं. ह्या सगळ्यातून पॉर्न addiction, गेमिंग च addiction, सोशल मीडिया वर भावनिक अवलंबन ह्या सगळ्या गोष्टी घडू शकतात आणि त्याचे वाईट परिणाम हे दूरगामी असू शकतात. 


नुकत्याच पुण्यात दोन दुर्दैवी घटना घडल्या त्यात 'सेक्सट्रोशन' हा नवीन प्रकार समोर आला, त्यात  दोन seperate घटनांमध्ये १९-२० वर्षाच्या मुलांनी आत्महत्या कारे पर्यंत गोष्टी गेल्या. 


ह्या सगळ्याचे किती वाईट परिणाम होऊ शकतात. ते होऊ नये ह्या साठी काय उपाय करायला हवे ? पालकांनी कसा आपल्या मुलांशी संवाद साधावा अश्या अनेक

विषयांवर गप्पा केल्या आहेत आजच्या ह्या भागात मुक्ता चैतन्य हिच्याशी 





Screentime with Mukta YouTube channel - https://youtube.com/channel/UCWC_Rm8W4PXrg_bhLVkVwIA


पुस्तकं विकत घेण्याची लिंक - https://www.amazon.in/dp/B08LSKX6HK/ref=cm_sw_r_wa_awdo_5Q4ZBZ3JV5D9BJ2E4C12


https://www.amazon.in/dp/B08KW8XHBX/ref=cm_sw_r_wa_awdo_856VKHK3RN7VE388KV6V


Screentime English आणि मराठी तसेच पॉर्न खेळ पुस्तक विकत घेण्यासाठी संपर्क 9823388828



ब्लॉग - https://muktachaitanya.wordpress.com/ 




#screentime #मराठी #marathipodcast #inspiration #inspirationkatta #katta #कट्टा #muktachaitanya #nachiketkshire  




--- Send in a voice message: https://anchor.fm/nachiket-satish-kshire/message