फ्री हिट - CCBK मुक्तपीठ, Ten India pace bowlers you should watch out for
Coffee, Cricket Aani Barach KaahiJanuary 07, 202300:18:0716.63 MB

फ्री हिट - CCBK मुक्तपीठ, Ten India pace bowlers you should watch out for

जसप्रीत बुमराह, मोहम्मद शामी, मोहम्मद सिराज आणि उम्रान मलिक तर आहेतच, परंतु भारताच्या जलदगती गोलंदाजीचा ताफा येणाऱ्या काळात चालू ठेवणारे १० गोलंदाज निवडले आहेत संदीप जगे ह्यांनी. संदीप, जे अलिबाग परिसरातील सुप्रसिद्ध क्रीडा समालोचक आहेत, त्यांनी त्यांच्या आवडीचे दहा गोलंदाज निवडले आहेत जे येणाऱ्या काळात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपला ठसा उमटवू शकतील. तुमचे टॉप-१० सुद्धा आम्हाला कळवा.
हा आहे आपल्या "फ्री हिट - CCBK मुक्तपीठ" सदरातील पहिला दृकश्राव्य भाग. आजवर फ्री हिट अंतर्गत CCBK परिवारातील सदस्यांनी लिहिलेले लेख आपण प्रसिद्ध केले आहेत. तुम्हीदेखील ५ ते १५ मिनिटांचा तुमच्या पसंतीच्या विषयावरील व्हिडिओ रेकॉर्ड करून आम्हाला ई-मेल द्वारे पाठवू शकाल. निवडक भाग आम्ही नक्की प्रसारित करू. रेकॉर्डिंग साधनांबाबतीत शंका असल्यास आधीच ई-मेल करा