Anuswad Episode 5 Harry Potter and Cursed Child अनुस्वाद भाग ५ हॅरी पॉटर आणि शापित पुत्र

Anuswad Episode 5 Harry Potter and Cursed Child अनुस्वाद भाग ५ हॅरी पॉटर आणि शापित पुत्र

कित्येक वर्ष लोकांच्या मनावर गारूड करणारी हॅरी पॉटर मालिका. तिचा आठवा भाग सुरू होतो सातव्या भागातील कथाभागानंतर एकोणीस वर्षांनी. तो लिहिला आहे नाट्यरूपात. अशा आगळ्यावेगळ्या फँटसीचा अनुवाद अतिशय वाचनीय आहे. तो रंजक, वाचनीय होण्यामागे अनुवादकांची प्रतिभा, अभ्यास, विचार किती महत्त्वाचे आहेत हे समजून घेण्यासारखे आहे.

किशोरवयातील हॅरी या पुस्तकात एक प्रेमळ पिता, जादू मंत्रालयाचा जबाबदार कर्मचारी म्हणून आपल्या समोर येतो. तरी त्याचा हळवेपणा तसाच आहे आणि लहानपणीची मैत्रीही घट्ट टिकून आहे आणि तेव्हाचा द्वेषही अजून तितकाच ताजा आहे.

पुस्तक अतिशय लोकप्रिय आहे आणि त्यांच्यावरच्या चित्रपटांमुळे वाचकांच्या डोळ्यांसमोर काही प्रतिमाही तयार झाल्या आहेत. अशा आव्हानात्मक साहित्यकृतीचा तितकाच समर्थ अनुवाद केला आहे शिरीष सहस्रबुद्धेआणि डॉ. सोनल सहस्रबुद्धे यांनी. उज्ज्वला आणि विदुला यांनी या दोघांशी मारलेल्या गप्पांमधून अनुवादाचे अनेक पैलू उलगडले आहेत.

हॅरी पॉटर आणि शापित पुत्र ही मराठी  छापील आवृत्ती इथे उपलब्ध आहे.

मूळ इंग्रजी पुस्तक print edition, ebook edition with audio/video  इथे उपलब्ध आहे.

mpsp,