Immortal India by Amish Tripathi – Marathi edition अमर्त्य भारत

लोकप्रिय इंग्रजी लेखक अमीश त्रिपाठी यांचं इम्मॉर्टल इंडिया हे नॉन-फिक्शन प्रकारातील पहिलंच पुस्तक. त्यांच्या वृत्तपत्रीय लेखनाचं आणि भाषणांचं संकलन. प्रचंड मोठ्या कालखंडात, प्रचंड बदलांना तोंड देत स्व-त्व टिकवून ठेवलेल्या या भारत देशाच्या अमर्त्य आत्म्याची ओळख करून घेण्याचा हा अमीशचा शोधप्रवास आहे. अतिशय प्रांजळपणे आणि खुल्या मनाने लिहिलेल्या या पुस्तकाचा तितक्याच सामर्थ्याने अनुवाद केला आहे विद्या हर्डीकर सप्रे (https://www.linkedin.com/in/vidya-sapre-8b81b441/) यांनी. अनुस्वादच्या या भागात मराठी आवृत्तीच्या प्रकाशक, यात्रा बुक्सच्या नीता गुप्ता  (https://www.linkedin.com/in/neetagupta/) सुद्धा सहभागी झाल्या आहेत. उज्ज्वला आणि विदुला यांनी या दोघींशी मारलेल्या गप्पांमधून अनुवादाचे अनेक पैलू उलगडले आहेत. हा भाग कॅलिफोर्नियातील अनुवादक, दिल्लीतील प्रकाशक आणि पुण्यातील अनुस्वादक यांच्यात वेगवेगळ्या वेळी केलेला संवाद आहे.  प्रकाशक भाषांतरासाठी पुस्तक कसं निवडतात, लेखकाच्या भाषेशी आणि विचारांशी तादात्म्य पावल्याने अनुवादावर कसा परिणाम होतो, मूळ पुस्तक आणि त्याचा अनुवाद लागोपाठ प्रसिद्ध होताना काय काय करावं लागतं, अशा अनेक गोष्टी या भागात ऐकायला मिळतील.

इम्मॉर्टल इंडियाची मराठी आवृत्ती अमर्त्य भारतची छापील आवृत्ती आणि इबुक आवृत्ती इथे उपलब्ध आहे.

मूळ इंग्रजी पुस्तक print edition, ebook edition and audio edition इथे उपलब्ध आहे.