Anuswad episode 2 Battle for Bittora अनुस्वाद भाग २ - बॅटल फॉर बिट्टोरा अर्थात जिन्नी

Anuswad episode 2 Battle for Bittora अनुस्वाद भाग २ - बॅटल फॉर बिट्टोरा अर्थात जिन्नी

पावित प्रदेशातील इलेक्सनची, इश्काची आणि दुश्मनीची रंगतदार कहाणी मूळ इंग्रजीत लिहिली आहे अनुजा चौहान यांनी. त्याचा तितकाच सुंदर अनुवाद आश्लेषा गोरे यांनी केला आहे. समकालीन कादंबरीचा अनुवाद करताना काय मजा येेते, काय विचार करावा लागतो, मूळ कादंबरीचा वेग, विनोद, परिणाम कायम ठेवण्यासाठी अनुवादकाला काय करावं लागतं हे या भागात उलगडलं आहे आश्लेषा, उज्ज्वला आणि विदुला यांच्या गप्पांमधून. मजेदार भाषा, मजेदार पात्रं आणि आपल्या अगदी ओळखीची गोष्ट - पण एका वेगळ्या कोनातून पाहिलेली - याबद्दल ऐकायला तुम्हाला नक्की आवडेल.  मराठी अनुवाद जिन्नी पुस्तकांच्या सर्व दुकानांमध्ये उपलब्ध. तसेच ऑनलाइन खरेदीसाठी https://www.amazon.in/Jinni-Marathi-Anuja-Chauhan/dp/B07Z2VNTX7 तसेच इबुक आवृत्तीसाठी https://www.amazon.in/Jinni-Battle-Bittora-Marathi-ebook/dp/B075FX3WCN  हे पुस्तक किंडल अनलिमिटेड वरही उपलब्ध आहे.  चला ऐकू या बिट्टोरा ते जिन्नी या प्रवासाची बखर!