देशातील बाजारात हळदीचे भाव सध्या नरमले आहेत. वायद्यांमधील सुधारणेमुळे गेल्या दीड ते दोन महिन्यांमध्ये बाजार समित्यांमध्येही दरवाढ झाली होती. दरात वाढ झाल्यानंतर देशात ५ ते ६ लाख टन हळदीची विक्री झाली. पण हळदीच्या भावातील सुधारणा जास्त दिवस टिकली नाही. सध्या हळदीचे भाव दबावात आले आहेत. मग सध्या हळदीला काय भाव मिळत आहे? हळदीचा पुरवठा कसा होतोय? याची माहिती तुम्हाला आजच्या शेतमार्केट पाॅडकास्टमधून मिळेल.