'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम वनिता खरात ही सध्या सोशल मीडियावरील सगळ्यात जास्त ट्रेन्डिंगमध्ये असलेली अभिनेत्री आहे. वनिता जे पोस्ट करते ते सध्या व्हायरल होतं. 'बुलेट ट्रेन' सारखा शो असो ..नाटक असो..की 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' ते अगदी बॉलीवूडमध्ये 'कबीर सिंग' सिनेमातील छोटीशी भूमिका असो वनितानं सगळीकडे आपलं नाणं खणखणीत वाजून दाखवलं. पण यामागे मोठं स्ट्रगल होतं हे विसरुन चालणार नाही. ईसकाळला दिलेल्या पॉडकास्ट मुलाखतीत वनितानं आपलं स्ट्रगल सांगतानाच आजही रिजेक्शनचा सामना होतो तेव्हा ते ती कसं हॅंडल करते याविषयी आणि अशा अनेक वैयक्तिक तसंच प्रोफेशनल गोष्टींविषयी मनमोकळा संवाद साधला आहे