इतर देशांनी आर्थिकदृष्ट्या विकसित होण्यात अमेरिकी व्यवस्थेला आणि तिथल्या भांडवलदारांना अडचण नसते; मात्र, अशा देशानं अमेरिकेच्या आणि पाश्चात्त्यांच्या जागतिक रचनेतील वर्चस्वाला शह देणं त्यांना मान्य होत नाही. चीन ते करतो आहे. आणि, अशा सक्रिय बनलेल्या चीनला रोखायचं तर अमेरिकेला आशिया आणि इंडोपॅसिफिक क्षेत्रात विश्वासार्ह साथीदारांची गरज आहे आणि अमेरिका भारताकडं याच नजरेतून पहातेय.....पंतप्रधान नरेंद्र मोदींचं अमेरिकेत झालेल्या स्वागतामागंही हेच गुपित दडलेलं असावं.