लपेट पट्टी हा जलोपचाराचा म्हणजे हायड्रोथेरपीचा एक प्रकार आहे. आपण म्हशींसारखं दिवसभर पाण्यात डुंबत बसू शकत नाही, म्हणून कापडात पाणी साठवून त्याचा उपचार. ही पट्टी वापरायला अशक्य सोपी आहे. पर्समधे घेऊन जाता येते, प्रवासात वापरता येते, आपलं काम करता करता लपेटून ठेवली, तरी ती आपलं काम करत रहाते. लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत बिनधोक वापरता येते. हर मर्ज़ की एकही दवा!

आणि ऐका गाजर हलवा पाककृती - एकदम नवीन, बनाने में आसान, खाने में मज़ेदार.त्याची पाककृती ॲड. कांता गिडवाणींकडून - १ वाटी किसलेलं गाजर, अर्धी वाटी खोवलेलं खोबरं, १/३ वाटी खजुराचे बारीक तुकडे, अर्धी वेलची. बदाम, बेदाणे, पिस्ते यांचे काप आवडीप्रमाणे. सुके मेवे सोडून बाकी सर्व मिक्सरमधून बारीक करून घ्या. (मिक्सर बंद-सुरू-बंद-सुरू असं करा, सलग खूप वेळ फिरवू नका.) एकजीव करा, वरून सुका मेव्याने सुशोभित करा, आस्वाद घ्या.

प्रकृती मध्ये सहभागी व्हायचंय?
तुमच्या प्रश्नांचं प्रकृती मध्ये स्वागत आहे. निसर्गोपचाराशी संबंधित काहीही प्रश्न, शंका विचारायचे असतील तर खाली दिलेल्या व्हॉइस मेसेज वरून आम्हाला जरूर विचारा.
 तुमचं नाव गाव सांगून मग तुमचा प्रश्न विचारा. https://audiowallah.com/prakruti

प्रकृतीपर्यंत पोचणं आता अधिक सोपं. फक्त या लिंकवर क्लिक करा, आणि तुमचा व्हॉइस मेसेज रेकॉर्ड करा. तुमचं नाव आणि गाव आधी सांगायला विसरू नका. https://audiowallah.com/prakruti

तुमचा अभिप्राय, प्रश्न, शंका, सूचना,अनुभव जरूर कळवा. रेकॉर्ड करा किंवा माझ्या फेसबुक पेजवर https://www.facebook.com/vidula.tokekar किंवा इन्स्टा पेज वर. https://www.instagram.com/vidulatokekar/?hl=en

#naturopathy,#prakruti,#translationpanacea,#shrutkeerti,#wetpack,#hydrotherapy,