टिटवी आणि गर्विष्ठ समुद्र

टिटवी आणि गर्विष्ठ समुद्र

एका समुद्रकिनाऱ्यावर टिटवी पक्ष्यांचं एक जोडपं रहात होतं. त्यातल्या मादीची अंडी घालायची वेळ जवळ आली होती. तिने नराला लवकरात लवकर एखादं शांत ठिकाण शोधायला सांगितलं, जिथे ती अंडी घालू शकेल. नर म्हणाला “हा समुद्रकिनारा किती सुंदर आहे, तू इथेच अंडी घाल!” त्यावर मादी म्हणाली “पौर्णिमेच्या दिवशी इथे इतकी मोठी भरती येते की त्यात मोठमोठे हत्तीही वाहून जातात. त्यामुळे तू लवकरात लवकर एखादं दुसरं ठिकाण शोध. नर म्हणाला “तुझं म्हणणं तर बरोबर आहे. पण या समुद्राची काय बिशाद आहे की तो माझ्या मुलांचं काही वाकडं करू शकेल. तू निर्धास्तपणे इथेच अंडी घाल!” तिकडे समुद्राने त्या दोघांचं बोलणं ऐकलं, आणि मनातल्या मनात म्हणाला “किती पोकळ गर्व आहे या पक्ष्यांमध्ये. रात्री तर असे पाय वर करून झोपतात, की जणू काही आकाशच उचलून धरताहेत. बघूया तरी यांची ताकद!” असं म्हणून समुद्र शांत झाला, आणि टिटवीने किनाऱ्यावर अंडी घातली. दुसऱ्याच दिवशी जेंव्हा हे जोडपं अन्न शोधायला गेलं, तेंव्हा समुद्राला भरती आली. साहजिकच टिटव्यांची अंडी वाहून गेली. ते परत आल्यावर जेंव्हा अंडी जागेवर दिसली नाहीत तेंव्हा मादी संतापाने नराला म्हणाली “अरे मूर्खा! मी तुला म्हटलं होतं की समुद्राच्या भरतीत माझी अंडी वाहून जातील. म्हणून तुला दुसरं ठिकाणही शोधायला सांगितलं होतं. पण तू तुझ्या मूर्खपणामुळे आणि गर्विष्ठपणामुळे माझं ऐकलं नाहीस!” नर म्हणाला “लाडके, तू काळजी करू नको. मी या समुद्राला सुकवून आपली अंडी परत आणेन!” मग नराने सारस, बदक, मोर इत्यादी मित्रांना बोलावून सांगितलं “मित्रांनो! हा समुद्र आमची अंडी घेऊन गेलाय. याला सुकवून आमची अंडी परत आणण्यासाठी तुम्ही मला मदत करा!” हे ऐकून त्या पक्ष्यांनी आपापसात चर्चा केली आणि म्हणाले “समुद्र सुकवायची ताकद आमच्यात नाही. मग उगाच श्रम घेण्यात काय अर्थ आहे? गरुडदेव आपले राजे आहेत. आपण सगळेजण जाऊन त्यांना हे सांगूया. ते नक्कीच आपल्याला मदत करतील!” असा निर्णय घेऊन सगळे पक्षी रडत रडत गरुडदेवांकडे गेले आणि म्हणाले “महाराज! घात झालाय. काहीही कारण नसताना या बिचाऱ्या टिटव्यांची अंडी समुद्राने नेलीत. तुमच्यासारखा शक्तिशाली राजा असताना समुद्राची अशी हिम्मतच कशी झाली!

एका समुद्रकिनाऱ्यावर टिटवी पक्ष्यांचं एक जोडपं रहात होतं. त्यातल्या मादीची अंडी घालायची वेळ जवळ आली होती. तिने नराला लवकरात लवकर एखादं शांत ठिकाण शोधायला सांगितलं, जिथे ती अंडी घालू शकेल. नर म्हणाला “हा समुद्रकिनारा किती सुंदर आहे, तू इथेच अंडी घाल!” त्यावर मादी म्हणाली “पौर्णिमेच्या दिवशी इथे इतकी मोठी भरती येते की त्यात मोठमोठे हत्तीही वाहून जातात. त्यामुळे तू लवकरात लवकर एखादं दुसरं ठिकाण शोध. नर म्हणाला “तुझं म्हणणं तर बरोबर आहे. पण या समुद्राची काय बिशाद आहे की तो माझ्या मुलांचं काही वाकडं करू शकेल. तू निर्धास्तपणे इथेच अंडी घाल!”

 

 

तिकडे समुद्राने त्या दोघांचं बोलणं ऐकलं, आणि मनातल्या मनात म्हणाला “किती पोकळ गर्व आहे या पक्ष्यांमध्ये. रात्री तर असे पाय वर करून झोपतात, की जणू काही आकाशच उचलून धरताहेत. बघूया तरी यांची ताकद!” असं म्हणून समुद्र शांत झाला, आणि टिटवीने किनाऱ्यावर अंडी घातली. दुसऱ्याच दिवशी जेंव्हा हे जोडपं अन्न शोधायला गेलं, तेंव्हा समुद्राला भरती आली. साहजिकच टिटव्यांची अंडी वाहून गेली. ते परत आल्यावर जेंव्हा अंडी जागेवर दिसली नाहीत तेंव्हा मादी संतापाने नराला म्हणाली “अरे मूर्खा! मी तुला म्हटलं होतं की समुद्राच्या भरतीत माझी अंडी वाहून जातील. म्हणून तुला दुसरं ठिकाणही शोधायला सांगितलं होतं. पण तू तुझ्या मूर्खपणामुळे आणि गर्विष्ठपणामुळे माझं ऐकलं नाहीस!”

 

 

नर म्हणाला “लाडके, तू काळजी करू नको. मी या समुद्राला सुकवून आपली अंडी परत आणेन!” मग नराने सारस, बदक, मोर इत्यादी मित्रांना बोलावून सांगितलं “मित्रांनो! हा समुद्र आमची अंडी घेऊन गेलाय. याला सुकवून आमची अंडी परत आणण्यासाठी तुम्ही मला मदत करा!” 

 

 

हे ऐकून त्या पक्ष्यांनी आपापसात चर्चा केली आणि म्हणाले “समुद्र सुकवायची ताकद आमच्यात नाही. मग उगाच श्रम घेण्यात काय अर्थ आहे? गरुडदेव आपले राजे आहेत. आपण सगळेजण जाऊन त्यांना हे सांगूया. ते नक्कीच आपल्याला मदत करतील!”

 

 

 

असा निर्णय घेऊन सगळे पक्षी रडत रडत गरुडदेवांकडे गेले आणि म्हणाले “महाराज! घात झालाय. काहीही कारण नसताना या बिचाऱ्या टिटव्यांची अंडी समुद्राने नेलीत. तुमच्यासारखा शक्तिशाली राजा असताना समुद्राची अशी हिम्मतच कशी झाली!