मूर्ख आणि सूचीमुख पक्षी

मूर्ख आणि सूचीमुख पक्षी

मूर्ख आणि सूचीमुख पक्षी नानाम्यं नमतजे दारु नाश्मनि स्यात्क्षुरक्रिया । सूचीमुखं विजानीहि नाशिष्यायोपदिश्यते ॥ नानाम्यं नमतजे दारु नाश्मनि स्यात्क्षुरक्रिया । सूचीमुखं विजानीहि नाशिष्यायोपदिश्यते ॥ वाकण्या लायक नसलेले लाकूड वाकत नाही, दगडाने दाढी करता येत नाही आणि अशिष्याला उपदेश करता येत नाही... सूचीमुख याचच उदाहरण आहे. कोण्या एका डोंगराळ भागातल्या एका जंगलात माकडांची टोळी राहत असे. एकदा पावसात भिजून गारठून गेल्याने ते कुडकुडत होते. काहीतरी करून थंडीपासून बचाव करण्यासाठी आगीसारखे दिसणारे कोरडे गवत त्यांनी एकत्र केले आणि फुंकर मारून त्यातून ऊब निर्माण करण्याचा ते प्रयत्न करू लागले. त्यांना अशा प्रकारे गवताच्या ढीगर्‍याभोवती बसून निरर्थक प्रयत्न कारताना पाहून सूचीमुख नावाचा एक पक्षी त्यांच्यापाशी येऊन म्हणाला, "हे काय मूर्खासारखं करताय. अशाने आग पेटणार नाही. इथे थंडीने कुडकुडण्यापेक्षा एखाद्या गुहेत जाऊन तिथे बसून स्वतःचा जीव वाचवा.. ढग गडगडतायत आणि आता अजून जोरात पाऊस पडणार आहे. त्यांच्यातला एक म्हातारं माकड म्हणाला, "तू तुझं काम कर, आम्हाला ज्ञान शिकवायची गरज नाहीये." पक्ष्याने म्हातार्‍या माकडाच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं आणि तो तीच गोष्ट परतपरत सांगू लागला, "अरे माकडांनो असे फुकट प्रयत्न करू नका." तो पक्षी अजिबातच ऐकेनासा झाला तेव्हा आपले प्रयत्न वाया गेल्यामुळे संतपून एका माकडाने त्याचे दोन्ही पंख पकडले आणि त्याला एका दगडावर आपटून मारून टाकले. म्हणूनच म्हणतात ज्याची योग्यताच नाही त्याला शिकवण्याचा प्रयत्न करू नये.

मूर्ख आणि सूचीमुख पक्षी

नानाम्यं नमतजे दारु नाश्मनि स्यात्क्षुरक्रिया ।

सूचीमुखं विजानीहि नाशिष्यायोपदिश्यते ॥

नानाम्यं नमतजे दारु नाश्मनि स्यात्क्षुरक्रिया ।

सूचीमुखं विजानीहि नाशिष्यायोपदिश्यते ॥

 

वाकण्या लायक नसलेले लाकूड वाकत नाही, दगडाने दाढी करता येत नाही आणि अशिष्याला उपदेश करता येत नाही... सूचीमुख याचच उदाहरण आहे. 

कोण्या एका डोंगराळ भागातल्या एका जंगलात माकडांची टोळी राहत असे. एकदा पावसात भिजून गारठून गेल्याने ते कुडकुडत होते. काहीतरी करून थंडीपासून बचाव करण्यासाठी आगीसारखे दिसणारे कोरडे गवत त्यांनी एकत्र केले आणि फुंकर मारून त्यातून ऊब निर्माण करण्याचा ते प्रयत्न करू लागले. 

त्यांना अशा प्रकारे गवताच्या ढीगर्‍याभोवती बसून निरर्थक प्रयत्न कारताना पाहून सूचीमुख नावाचा एक पक्षी त्यांच्यापाशी येऊन म्हणाला, "हे काय मूर्खासारखं करताय. अशाने आग पेटणार नाही. इथे थंडीने कुडकुडण्यापेक्षा एखाद्या गुहेत जाऊन तिथे बसून स्वतःचा जीव वाचवा.. ढग गडगडतायत आणि आता अजून जोरात पाऊस पडणार आहे.

त्यांच्यातला एक म्हातारं माकड म्हणाला, "तू तुझं काम कर, आम्हाला ज्ञान शिकवायची गरज नाहीये." 

पक्ष्याने म्हातार्‍या माकडाच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं आणि तो तीच गोष्ट परतपरत सांगू लागला, "अरे माकडांनो असे फुकट प्रयत्न करू नका." 

तो पक्षी अजिबातच ऐकेनासा झाला तेव्हा आपले प्रयत्न वाया गेल्यामुळे संतपून एका माकडाने त्याचे दोन्ही पंख पकडले आणि त्याला एका दगडावर आपटून मारून टाकले. 

म्हणूनच म्हणतात ज्याची योग्यताच नाही त्याला शिकवण्याचा प्रयत्न करू नये.