जीर्णधन बनिये की तराजू

जीर्णधन बनिये की तराजू

जीर्णधन बनिये की तराजू कोण्या एका नगरात जीर्णधन नावाचा एक व्यापारी रहात होता. त्याच्या गाठी असलेलं धन संपलं असता,त्याने दूर देशी व्यापारासाठी जायचा विचार केला. त्याच्यापाशी त्याच्या पूर्वजांचा एक मोठा जाड जूड तराजू होता. तो एका शेठजिंकडे उधार ठेऊन तो परदेशी गेला. बराच काळ लोटल्यानंतर तो व्यापारी आपल्या शहरी परतला आणि त्या शेठजींकडे जाऊन म्हणाला, "शेठजी! तुमच्याजवळ उधार ठेवलेला माझा तराजू तुम्ही मला परत द्या. शेठ ने म्हंटलं" अरे भावा तुझा तराजू तर माझ्यापाशी नाही. तो तर उंदरांनी खाऊन टाकला. जीर्णधन उत्तरला," आता जर तराजू उंदरांनी खाल्ला असेल तर त्यात तुमची काहीच चूक नाही." काही विचार करत जीर्णधन पुढे म्हणाला, "शेठजी! मी आत्ताच नदीकाठी स्नानाला चाललो आहे. माझ्याजवळ एव्हढं सामान आहे त्यामुळे तुम्ही तुमच्या मुलाला माझ्यासोबत पाठवा." शेठजीनेही विचार केला की हा जर अजून काही वेळ इथे थांबला तर माझी चोरी उघडी पडेल, आणि त्याने आपल्या मुलाला जीर्णधनाबरोबर पाठवून दिले. शेठजीचा मुलगा आनंदाने जीर्णधनाचे सामान उचलून त्याच्या सोबत निघाला. जीर्णधनाने आपलं स्नान झाल्यानंतर त्या मुलाला एका गुहेत बंद करून त्याच्या दारावर मोठा दगड ठेवला आणि जीर्णधन एकटाच आपल्या घरी परत आला. जेव्हा शेठजींना आपलं मुलगा दिसला दिसेना त्यांनी विचारलं, अरे जीर्णधन! माझा मुलगा कुठे आहे? तो तुझ्याचबरोबर नदीत आंघोळीला गेला होता न? जीर्णधन म्हणाला, "हो! पण एका ससाण्याने त्याला उचलून नेले." शेठ म्हणाला," अरे खोटारड्या! इतक्या मोठ्या मुलाला काय ससाणा उचलून नेणार आहे?माझा मुलगा मला परत दे नाहीतर मी राज सभेत तक्रार करेन." जीर्णधन म्हणाला,"ए सत्यवाद्या, ज्या प्रकारे मुलाला घार उचलून नेऊ शकत नाही, तसच लोखंडी तराजू उंदीर खाऊ शकत नाहीत. जर तुला तुयाजा मुलगा परत हवा असेल तर माझा तराजू मला परत दे." अशा प्रकारे दोघात वाद वाढला आणि ते भांडत राजसभेत पोहोचले, तिथे पोहोचून शेठ तावातावात मोठ्या आवाजात म्हणाला,"माझ्यावर घोर अन्याय झाला आहे. ह्या दुष्टणे माझा मुलगा चोराला आहे." धर्माधिकार्‍याने जेव्हा जीर्णधनाला शेठजींच्या मुलाला परत देण्यास सांगितलं तसा तो म्हणाला," मी काय करू! मी नदीत स्नानासाठी गेलो होतो आणि माझ्या देखत नदी काठावरून ससाण्याने मुलाला उचलून नेलं." त्याचं बोलणं ऐकून धर्माधिकारी म्हणाला, "तू खोटं बोलतो आहेस. एक ससाणा कधी मुलाला उचलून नेऊ शकतो का?" जीर्णधन उत्तरला, "जिथे उंदीर लोखंडी तराजू खाऊ शकतात, तिथे ससाणा मुलाला नक्कीच नेऊ शकतो." असं म्हणून त्याने राजाला सगळा वृतांत कथन केला. राजाने शेठला जीर्ण धनाचा तराजू परत द्यायला सांगितलं त्यानंतर जीर्ण धनाने शेठजींचा मुलगा त्यांना परत दिला. अशा प्रकारे जीर्णधनाने आपल्या चतुराई ने आपला तराजू परत मिळवला.

जीर्णधन बनिये की तराजू 

कोण्या एका नगरात जीर्णधन नावाचा एक व्यापारी रहात होता. त्याच्या गाठी असलेलं धन संपलं असता,त्याने दूर देशी व्यापारासाठी जायचा विचार केला.

त्याच्यापाशी त्याच्या पूर्वजांचा एक मोठा जाड जूड तराजू होता. तो एका शेठजिंकडे उधार ठेऊन तो परदेशी गेला. बराच काळ लोटल्यानंतर तो व्यापारी आपल्या शहरी परतला आणि त्या शेठजींकडे जाऊन म्हणाला, "शेठजी! तुमच्याजवळ उधार ठेवलेला माझा तराजू तुम्ही मला परत द्या. शेठ ने म्हंटलं" अरे भावा तुझा तराजू तर माझ्यापाशी नाही. तो तर उंदरांनी खाऊन टाकला. जीर्णधन उत्तरला," आता जर तराजू उंदरांनी खाल्ला असेल तर त्यात तुमची काहीच चूक नाही." 

काही विचार करत जीर्णधन पुढे म्हणाला,

 "शेठजी! मी आत्ताच नदीकाठी स्नानाला चाललो आहे. माझ्याजवळ एव्हढं सामान आहे त्यामुळे तुम्ही तुमच्या मुलाला माझ्यासोबत पाठवा." शेठजीनेही विचार केला की हा जर अजून काही वेळ इथे थांबला तर माझी चोरी उघडी पडेल, आणि त्याने आपल्या मुलाला जीर्णधनाबरोबर पाठवून दिले.

शेठजीचा मुलगा आनंदाने जीर्णधनाचे सामान उचलून त्याच्या सोबत निघाला. जीर्णधनाने आपलं स्नान झाल्यानंतर त्या मुलाला एका गुहेत बंद करून त्याच्या दारावर मोठा दगड ठेवला आणि जीर्णधन एकटाच आपल्या घरी परत आला. जेव्हा शेठजींना आपलं मुलगा दिसला दिसेना त्यांनी विचारलं, अरे जीर्णधन! माझा मुलगा कुठे आहे? तो तुझ्याचबरोबर नदीत आंघोळीला गेला होता न? जीर्णधन म्हणाला, "हो! पण एका ससाण्याने त्याला उचलून नेले."

शेठ म्हणाला," अरे खोटारड्या! इतक्या मोठ्या मुलाला काय ससाणा उचलून नेणार आहे?माझा मुलगा मला परत दे नाहीतर मी राज सभेत तक्रार करेन."

जीर्णधन म्हणाला,"ए सत्यवाद्या, ज्या प्रकारे मुलाला घार उचलून नेऊ शकत नाही, तसच लोखंडी तराजू उंदीर खाऊ शकत नाहीत. जर तुला तुयाजा मुलगा परत हवा असेल तर माझा तराजू मला परत दे." 

अशा प्रकारे दोघात वाद वाढला आणि ते भांडत राजसभेत पोहोचले, तिथे पोहोचून शेठ तावातावात मोठ्या आवाजात म्हणाला,"माझ्यावर घोर अन्याय झाला आहे. ह्या दुष्टणे माझा मुलगा चोराला आहे."

धर्माधिकार्‍याने जेव्हा जीर्णधनाला शेठजींच्या मुलाला परत देण्यास सांगितलं तसा तो म्हणाला," मी काय करू! मी नदीत स्नानासाठी गेलो होतो आणि माझ्या देखत नदी काठावरून ससाण्याने मुलाला उचलून नेलं."

त्याचं बोलणं ऐकून धर्माधिकारी म्हणाला, "तू खोटं बोलतो आहेस. एक ससाणा कधी मुलाला उचलून नेऊ शकतो का?"

जीर्णधन उत्तरला, "जिथे उंदीर लोखंडी तराजू खाऊ शकतात, तिथे ससाणा मुलाला नक्कीच नेऊ शकतो."

असं म्हणून त्याने राजाला सगळा वृतांत कथन केला. राजाने शेठला जीर्ण धनाचा तराजू परत द्यायला सांगितलं त्यानंतर जीर्ण धनाने शेठजींचा मुलगा त्यांना परत दिला. 

अशा प्रकारे जीर्णधनाने आपल्या चतुराई ने आपला तराजू परत मिळवला.