धर्मबुद्धी आणि पापबुद्धी

धर्मबुद्धी आणि पापबुद्धी

धर्मबुद्धी आणि पापबुद्धी धर्मबुद्धिः कुबुद्धिश्चः द्वावेतौ विदितौ मम् । पुत्रेण व्यर्थपाण्डित्यात्पिता धूमेन घातितः ॥ धर्मबुद्धी आणि कुबुद्धी या दोघांना मी जाणलं. पुत्राच्या मूर्खतेमुळे त्याचा पिता धूराने मारला गेला. कोण्या गावात धर्मबुद्धी आणि पापबुद्धी नामक दोन मित्र रहात होते. एके दिवशी पापबुद्धीने विचार केला की मी तर मूर्ख आहे, म्हणूनच गरीब आहे. का न मी धर्मबुद्धीसोबत एकत्र विदेशी जाऊन व्यापार करावा आणि नंतर ह्याला लुबाडुन खूप सारं धन मिळवावं. असा विचार करून पापबुद्धी धर्मबुद्धीला म्हणाला,"आपण या गावात आपला वेळ व्यर्थ घालवतो आहोत. आपण जर शहरात जाऊन कुठला व्यवसाय केला तर? धर्मबुद्धीने आपल्या मित्राचं म्हणणं मान्य केलं. आणि त्याच्यासोबत शहरात गेला. दोघ भावांनी अनेक दिवस शहरात राहून व्यवसाय केला आणि उत्तम धन कमावलं. एके दिवशी दोघांनी आपल्या गावी परतायचं मनाशी ठरवलं. गावाजवळ पोचल्यावर पापबुद्धी धर्मबुद्धीला म्हणाला,"मित्रा! इतकी सारी संपत्ती घरी घेऊन जाणा योग्य नाही. आपण यातलं थोडं धन काढून इथेच कुठे जमिनीत पुरलं तर! पुढे जाऊन जशी गरज पडेल इथे येऊन आपण काढून घेत जाऊ. धर्मबुद्धीने त्याला मान्यता दिली. एके रात्री पापबुद्धी जंगलात गेला आणि त्या खड्यातून तिने सारी संपत्ती काढून आणली. दुसर्‍या दिवशी पापबुद्धी धर्मबुद्धीच्या घरी गेला आणि म्हणाला," मित्रा! माझं कुटुंब खूप मोठं आहे. माला घर चालवायला जास्त धनाची आवश्यकता आहे, त्यामुळे आपण जंगलात जाऊन थोडं धन काढून आणू." दोघं एकत्र जंगलात गेले. जेव्हा दोघांनी मिळून ज्या जागी संपत्ती पुरली होती त्या जागी खोदलं तेव्हा ते धनाचं पत्र रिकामच आढळलं. तेव्हा पापबुद्धी आपल्या डोक्यावर हात मारत म्हणाला,"धर्मबुद्धी! तूच हे धन चोरलं आहेस. तुझ्याशिवाय इतर कुणाला ह्या जागेची कल्पनाच नाहीये. आता त्वरित माझा अर्धा हिस्सा मला परत दे नाहीतर माझ्या बरोबर राजसभेत चल, तिथेच ह्याचा निर्णय होईल."

धर्मबुद्धी आणि पापबुद्धी

धर्मबुद्धिः कुबुद्धिश्चः द्वावेतौ विदितौ मम् ।

पुत्रेण व्यर्थपाण्डित्यात्पिता धूमेन घातितः ॥

धर्मबुद्धी आणि कुबुद्धी या दोघांना मी जाणलं. पुत्राच्या मूर्खतेमुळे त्याचा पिता धूराने मारला गेला. 

कोण्या गावात धर्मबुद्धी आणि पापबुद्धी नामक दोन मित्र रहात होते. एके दिवशी पापबुद्धीने विचार केला की मी तर मूर्ख आहे, म्हणूनच गरीब आहे. का न मी धर्मबुद्धीसोबत एकत्र विदेशी जाऊन व्यापार करावा आणि नंतर ह्याला लुबाडुन खूप सारं धन मिळवावं.

असा विचार करून पापबुद्धी धर्मबुद्धीला म्हणाला,"आपण या गावात आपला वेळ व्यर्थ घालवतो आहोत. आपण जर शहरात जाऊन कुठला व्यवसाय केला तर? धर्मबुद्धीने आपल्या मित्राचं म्हणणं मान्य केलं. आणि त्याच्यासोबत शहरात गेला. 

दोघ भावांनी अनेक दिवस शहरात राहून व्यवसाय केला आणि उत्तम धन कमावलं. एके दिवशी दोघांनी आपल्या गावी परतायचं मनाशी ठरवलं. गावाजवळ पोचल्यावर पापबुद्धी धर्मबुद्धीला म्हणाला,"मित्रा! इतकी सारी संपत्ती घरी घेऊन जाणा योग्य नाही. आपण यातलं थोडं धन काढून इथेच कुठे जमिनीत पुरलं तर! पुढे जाऊन जशी गरज पडेल इथे येऊन आपण काढून घेत जाऊ. धर्मबुद्धीने त्याला मान्यता दिली.

एके रात्री पापबुद्धी जंगलात गेला आणि त्या खड्यातून तिने सारी संपत्ती काढून आणली.

दुसर्‍या दिवशी पापबुद्धी धर्मबुद्धीच्या घरी गेला आणि म्हणाला," मित्रा! माझं कुटुंब खूप मोठं आहे. माला घर चालवायला जास्त धनाची आवश्यकता आहे, त्यामुळे आपण जंगलात जाऊन थोडं धन काढून आणू." दोघं एकत्र जंगलात गेले. 

जेव्हा दोघांनी मिळून ज्या जागी संपत्ती पुरली होती त्या जागी खोदलं तेव्हा ते धनाचं पत्र रिकामच आढळलं. तेव्हा पापबुद्धी आपल्या डोक्यावर हात मारत म्हणाला,"धर्मबुद्धी! तूच हे धन चोरलं आहेस. तुझ्याशिवाय इतर कुणाला ह्या जागेची कल्पनाच नाहीये. आता त्वरित माझा अर्धा हिस्सा मला परत दे नाहीतर माझ्या बरोबर राजसभेत चल, तिथेच ह्याचा निर्णय होईल."