ढेकूण आणि ऊ.

ढेकूण आणि ऊ.

एका राजाच्या राजमहालातील एका मनोहर शयनगृहातल्या स्वच्छ कपड्यात एक सफेद ऊ होती. ती राजा झोपी गेल्यानंतर त्यांचं रक्त पिऊन मोठ्या आनंदाने राहात असे. एके दिवशी फिरत फिरत एक ढेकूण तिथे आला. ढेकणाला पलंगावर पाहून ऊ म्हणाली, "तू इथे कसा आलास? तुझ्याविषयी कोणाला काही कळण्याआधी तू जा बरं इथून निघून." त्यावर ढेकूण म्हणला, "अरे! घरी आलेल्या दुष्टाबरोबरही कोणी असं बोलत नाही. मी माझ्या आयुष्यात ना ना प्रकारच्या माणसांचं रक्त प्यायलोय पण अजून एखाद्या राजाचं गोड रक्त प्यायचं भाग्य काही मला लाभलं नाही. घरी आलेल्याला भुकेल्याला भोजनापासून लांब ठेवून असं एकट्यानेच राजाचं स्वादिष्ट रक्त पिणं तुला शोभत नाही. ढेकणाचं बोलणं ऐकून ऊ म्हणाली. "मी राजा झोपला की त्याचं रक्त पिते. पण तू आहेस वळवळ्या. जर तुला माझ्याबरोबर राजाचं रक्त प्यायचं असेल तर जरा थांब. आणि माझं पिऊन झालं की तू पण मनसोक्त रक्त पिऊन तृप्त हो. त्यावर ढेकूण म्हणला, "चालेल मी असंच करतो. जो पर्यंत तू राजाचं रक्त पित नाहीस तो पर्यंत मीही नाही पिणार." अशा प्रकारे ते दोघं एकमेकांशी बोलत होते तेवढ्यात राजा तिथे येऊन पलंगावर झोपला. तेवढ्यात ढेकणाच्या तोंडाला सुटलं पाणी. तो लागलीच राजाला चावला. राजा कळवळून पलंगावरून उठून उभा राहिला आणि आपल्या सेवकांना म्हणला, "बघा रे या चादरीत कुठे ढेकूण किंवा ऊ तर नाहीये नां. जी मला आताच चावली. राजाने असं म्हटल्यावर सेवक बारीक नजरेने चादर पाहू लागले. ढेकूण पटकन पलंगात शिरून लपून बसला. मात्र चादरीवरच्या वळ्यांमध्ये बसलेली ऊ सेवकांच्या दृष्टीला पडली आणि त्यांनी तिला मारून टाकलं. म्हणूनच म्हणतात, ज्याचा स्वभाव आपल्याला माहीत नाही. त्याला आश्रय देऊ नये.

एका राजाच्या राजमहालातील एका मनोहर शयनगृहातल्या स्वच्छ कपड्यात एक सफेद ऊ होती. ती राजा झोपी गेल्यानंतर त्यांचं रक्त पिऊन मोठ्या आनंदाने राहात असे. एके दिवशी फिरत फिरत एक ढेकूण तिथे आला. ढेकणाला पलंगावर पाहून ऊ म्हणाली, "तू इथे कसा आलास? तुझ्याविषयी कोणाला काही कळण्याआधी तू जा बरं इथून निघून." त्यावर ढेकूण म्हणला, "अरे! घरी आलेल्या दुष्टाबरोबरही कोणी असं बोलत नाही. मी माझ्या आयुष्यात ना ना प्रकारच्या माणसांचं रक्त प्यायलोय पण अजून एखाद्या राजाचं गोड रक्त प्यायचं भाग्य काही मला लाभलं नाही. घरी आलेल्याला भुकेल्याला भोजनापासून लांब ठेवून असं एकट्यानेच राजाचं स्वादिष्ट रक्त पिणं तुला शोभत नाही. 

ढेकणाचं बोलणं ऐकून ऊ म्हणाली. "मी राजा झोपला की त्याचं रक्त पिते. पण तू आहेस वळवळ्या. जर तुला माझ्याबरोबर राजाचं रक्त प्यायचं असेल तर जरा थांब. आणि माझं पिऊन झालं की तू पण मनसोक्त रक्त पिऊन तृप्त हो. 

त्यावर ढेकूण म्हणला, "चालेल मी असंच करतो. जो पर्यंत तू राजाचं रक्त पित नाहीस तो पर्यंत मीही नाही पिणार." 

अशा प्रकारे ते दोघं एकमेकांशी बोलत होते तेवढ्यात राजा तिथे येऊन पलंगावर झोपला. तेवढ्यात ढेकणाच्या तोंडाला सुटलं पाणी. तो लागलीच राजाला चावला. 

राजा कळवळून पलंगावरून उठून उभा राहिला आणि आपल्या सेवकांना म्हणला, "बघा रे या चादरीत कुठे ढेकूण किंवा ऊ तर नाहीये नां. जी मला आताच चावली.

राजाने असं म्हटल्यावर सेवक बारीक नजरेने चादर पाहू लागले. ढेकूण पटकन पलंगात शिरून लपून बसला. मात्र चादरीवरच्या वळ्यांमध्ये बसलेली ऊ सेवकांच्या दृष्टीला पडली आणि त्यांनी तिला मारून टाकलं. 

म्हणूनच म्हणतात, ज्याचा स्वभाव आपल्याला माहीत नाही. त्याला आश्रय देऊ नये.