"अहो टिळक, तुम्ही लंडनला आलात, आता तरी हे सोवळे-ओवळे सोडा आणि इथल्यासारखं वागा!" त्यांचे मित्र त्यांना सांगत होते. पण टिळक कसले ऐकतायत! विषय असा होता की लोकमान्य टिळक कामासाठी इंग्लंडला गेले होते. तिथे थंडी प्रचंड, त्यामुळे त्यांनी कोट, बूट, टाय सगळा पेहराव बदलला. पण पोटाच्या बाबतीत मात्र त्यांनी एक कडक 'रुल' बनवला होता. त्यांनी ठरवलं होतं की "मी माझं सकाळचं खाणं—म्हणजे बेड टी आणि ब्रेकफास्ट—माझ्या हातानेच बनवेन!" लोक म्हणायचे, "अहो, इथे कोण बघतंय? खा की बाहेरचं!" पण टिळकांचं उत्तर तयार होतं. ते म्हणाले, "मी इथे त्यांची संस्कृती शिकायला किंवा त्यांची कॉपी करायला आलेलो नाही. मी माझ्या कामासाठी आलोय. जिथे गरज आहे तिथे मी कपडे बदलले, कारण ती थंडीची गरज आहे. पण अन्नाच्या बाबतीत मला गरज वाटत नाही, मग तिथे मी माझा भारतीयपणा का सोडू?" त्यांनी परदेशात राहूनही स्वतःची लाईफस्टाईल आणि तत्त्वं सोडली नाहीत. 'Bread and Breakfast at home, Lunch and Dinner outside' हे त्यांचं सूत्र होतं. आज आपण थोडं जरी बाहेर गेलो तरी लगेच बदलतो, 'मॉडर्न' होण्याच्या नादात आपली मुळं तोडतो. पण टिळकांनी दाखवून दिलं की तुम्ही जगात कुठेही जा, तुमची ओळख आणि तुमची संस्कृती हीच तुमची खरी ताकद असते. खरा 'स्वॅग' तोच, जो आपली ओळख जपतो...