अक्षय शिंपी हा कलाकार म्हणून किती ताकदीचा आहे याची प्रचिती येण्यासाठी तुम्हाला अक्षयचं दास्ताने बडी बाका आणि दास्ताने रामजी पाहायला हवं. कुठलाही सेट नाही, संगीतसाथ नाही, प्रकाशयोजना नाही… अक्षय आणि त्याची सहकलाकार फक्त performance च्या जोरावर तुम्हाला अडीच तास खुर्चीवर खिळवून ठेवतात. पण दास्तान गोई म्हणजे नेमकं काय? उर्दू भाषेतला हा प्रयोग अक्षयला मराठीत का करावासा वाटला ? या प्रयोगात नक्की काय घडतं ? या प्रयोगाचं सगळ्यांकडून इतकं कौतुक का होतंय ? हा प्रयोग उभा करण्याची प्रोसेस काय होती? अशा अनेक गोष्टींवर नविन काळेने अक्षयशी गप्पा मारल्यात.