श्रोतेहो, सूत्रधार मध्ये आज आपण स्यमंतक मण्याबद्दलची कथा ऐकूया. स्यमंतक मणि हे असं एक रत्न होतं. ज्यामध्ये स्वतः भगवान सूर्यदेव यांचं तेज समाविष्ट झालेलं होतं. हा मणी ज्या राज्यात असेल ते राज्य धनधान्याने समृद्ध असे. हा मणी आपल्याचजवळ असावा असं प्रत्येकाला वाटे.
एकदा साक्षात भगवान श्रीकृष्णालाही स्यमंतक मणी मिळवण्याची इच्छा झाली. बालपणी गोपिकांकडून
लोणी चोरून खाणारा श्रीकृष्ण माखनचोर म्हणून ओळखला जाई. परंतु यावेळी भगवान श्रीकृष्णावर जो
आरोप केला गेला तो गंमत म्हणून केलेल्या चोरीबद्दल नव्हता बरं का!
Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices