सूर्यदेव चा सारथी - अरुण
सत्ययुगाच्या प्रारंभात ब्रह्मदेवच्या आशीर्वादाने दक्ष प्रजापतिच्या तेरा मुलींचा विवाह प्रजापति मरीचिचा पुत्र ऋषि कश्यप यांच्याशी झाला. कश्यप ऋषि आणि त्यांच्या पत्नींपासून विश्वात अनेक प्रजाती आणि वनस्पतींची उत्पत्ति झाली. हा प्रसंग त्यांच्यातीलच दोन पत्नी कद्रू आणि विनता यांच्याशी निगडीत आहे. कद्रू च्या गर्भातून नाग तसच विनताच्या गर्भातून पक्षीराज गरुड़ आणि सूर्यदेवाचा सारथी अरुण यांचा जन्म झाला. काय आहे ह्यांच्या जन्माची कथा? का असतं गरुड आणि नागचं वैर? या प्रश्नाची उत्तरं जाणून घेण्यासाठी ऐका कद्रू आणि विनताची ही कथा.
कश्यप ऋषींनी एके दिवशी आपल्या पत्नींना त्यांच्या इच्छेनुसार वर मागायला संगितले. कद्रू ने एक हज़ार तेजस्वी पुत्रांची कामना केली. विनता म्हणाली,"मला कद्रूच्या एक हजार पुत्रांपेक्षाही तेजस्वी असे दोन पुत्र व्हावेत." कश्यप ऋषी, त्यांना इच्छापूर्तीचा वर देऊन आपल्या तपश्चर्येत मग्नत झाले.
Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices