देवराज नहुष

देवराज नहुष

भूलोकी अनेक वर्ष धर्माने राज्य करून शौर्य आणि वैभव अर्जित केल्यानंतर असं काय घडलं ज्यामुळे नहुष महाराजांना देवांचा राजा बनावं लागलं. पहा कसा होता देवराजा नहुषाचा कार्यकाल... युगानुयुगे स्वर्गलोकवर राज्य केल्यानंतर इंद्रला ऐश्वर्याची चटक लागली होती आणि त्याच्या मनात या बद्दल अहंकार जागा झाला. एका काय झालं, इंद्रलोकी नेहेमी प्रमाणे उत्सवाचं वातावरण होतं. देवी शची सह आपल्या आसनावर विराजमान झालेला इंद्र नृत्य आणि गायनाचा आनंद घेत होता. देवता, ऋषि, मुनी, मरुदगण, दिग्पाल, गंधर्व, नाग तथा अप्सरा चारही बाजूंनी इंद्रची पूजा करण्यात मग्न होते. आधीच गर्वाने फुगलेल्या इंद्राला या जयजय कारामुळे अजूनच उकळ्या फुटत होत्या. त्याच वेळी देवगुरू बृहस्पतींच इंद्रलोकी आगमन झालं, देवगुरूना येताना पाहून ना इंद्राने उठून त्यांना अभिवादन केलं की ना बृहस्पतींना आसन ग्रहण करण्यास आमंत्रण दिलं.

भूलोकी अनेक वर्ष धर्माने राज्य करून शौर्य आणि वैभव अर्जित केल्यानंतर असं काय घडलं ज्यामुळे नहुष महाराजांना देवांचा राजा बनावं लागलं. पहा कसा होता देवराजा नहुषाचा कार्यकाल...

युगानुयुगे स्वर्गलोकवर राज्य केल्यानंतर इंद्रला ऐश्वर्याची चटक लागली होती आणि त्याच्या मनात या बद्दल अहंकार जागा झाला. एका काय झालं, इंद्रलोकी नेहेमी प्रमाणे उत्सवाचं वातावरण होतं. देवी शची सह आपल्या आसनावर विराजमान झालेला इंद्र नृत्य आणि गायनाचा आनंद घेत होता. देवता, ऋषि, मुनी, मरुदगण, दिग्पाल, गंधर्व, नाग तथा अप्सरा चारही बाजूंनी इंद्रची पूजा करण्यात मग्न होते. आधीच गर्वाने फुगलेल्या इंद्राला या जयजय कारामुळे अजूनच उकळ्या फुटत होत्या. त्याच वेळी देवगुरू बृहस्पतींच इंद्रलोकी आगमन झालं, देवगुरूना येताना पाहून ना इंद्राने उठून त्यांना अभिवादन केलं की ना बृहस्पतींना आसन ग्रहण करण्यास आमंत्रण दिलं.