खेळपट्टी नक्की कशी तयार करतात? प्रत्येक क्रिकेट चाहत्याच्या मनात हा प्रश्न कायम येतो. जाणून घेऊया खेळपट्टीशी निगडित सर्व प्रश्नांची उत्तरे सुविख्यात क्युरेटर प्रवीण हिंगणीकर यांच्याकडून. विदर्भाचे कर्णधार, नंतर प्रशिक्षक व BCCI सामनाधिकारी ह्या विविध जबाबदाऱ्या निभावलेल्या हिंगणीकरांनी गेल्या दशकभराहून जास्त काळात स्वतःची क्युरेटर म्हणून ओळख निर्माण केली आहे. बांगलादेश क्रिकेट बोर्डचे मुख्य क्युरेटर असलेल्या हिंगणीकरांशी मारूया गप्पा 'पडद्यामागील शिलेदार' सदरात. ऐकूया पूर्वार्ध