CCBK Saaptahik, कोहली-पुजारा यांना गवसेल का सूर ?
Coffee, Cricket Aani Barach KaahiFebruary 27, 202300:18:3617.07 MB

CCBK Saaptahik, कोहली-पुजारा यांना गवसेल का सूर ?

ऑस्ट्रेलियाच्या महिलांनी T२० विश्वचषक अपेक्षेप्रमाणे पटकावला. फिटनेस, क्षेत्ररक्षण आणि अनुभवाच्या जोरावर त्यांनी सलग तिसरा आणि एकूण सहावा विश्वचषक जिंकला. दुसरीकडे ऑस्ट्रेलियाचे पुरूष मात्र कसोटी सामना पाच दिवस तरी चालवू शकणार का हा प्रश्न आहे. पॅट कमिन्सच्या जागी नेतृत्त्व करणारा स्टीव्ह स्मिथ करू शकेल का काही चमत्कार ? कॅमरून ग्रीन आणि स्टार्क पहिल्यांदाच दिसतील का मालिकेमध्ये ? आणि सगळ्यात महत्त्वाच म्हणजे आपल्या सगळ्यांचा लाडका केएल राहुल खेळेल का या सामन्यामध्ये.. या सगळ्या प्रश्नांची चर्चा करत आहेत साप्ताहिक सीसीबीकेमध्ये अमोल क-हाडकर आणि हा सामना कव्हर करायला गेलेले सुनंदन लेले.