Mills and Boon love stories are an unique genre in itself. Exciting for reading, and equally challenging for translation into an entirely different culture.  TranslationPanacea had helped the publishers with Marathi translation of 11 novels by Mills and Boon, and in this episode, the translators Sayali Godse and Minal Pawar share with us how they successfully brought all the romance and love and variety of M&B into Marathi, maintaining sensibilites of the target language.

शृंगार हा साहित्यप्रकार अनुवाद करायला फार कठीण. सांस्कृतिक फरकांना झेपेल, पण वाचकाला अनोख्या दुनियेतही घेऊन जाईल हा तोल शृंगारिक साहित्याच्या अनुवादात सांभाळावा लागतो, आणि ही पुस्तकं जेव्हा अगदी सर्वसामान्य वाचकांसाठी लिहिली गेलेली असतात, तेव्हा भाषेचा सोपेपणा हा एक कोनही त्यात येतो. मिल्स अँड बून च्या अकरा प्रेमकादंबऱ्यांचा अनुवाद प्रकाशित करण्यासाठी ट्रान्सलेशनपॅनाशियाने मदत केली होती. त्यांच्या अनुवादकांशी या भागात गप्पा मारल्या आहेत. सायली गोडसे आणि मीनल पवार या दोघी अनुवादक आपल्याला सांगताहेत प्रणयकथांच्या यशस्वी अनुवादांचं रहस्य.