एकेकाळी जगभर गाजणारी पैठणी, गजबजलेल्या व्यापारी पेठा आणि समृद्ध खाद्यसंस्कृती ही मराठवाड्याची ओळख होती. पण आज या प्रदेशाचा वस्त्रोद्योग संघर्ष करत आहे आणि अनेक पारंपरिक खाद्यपरंपरा हळूहळू विस्मृतीत जात आहेत. या भागात आपण पैठणीच्या वैभवशाली इतिहासापासून ते आजच्या विणकरांच्या संघर्षापर्यंतचा प्रवास समजून घेणार आहोत. तसेच मराठवाड्याच्या खाद्यसंस्कृतीत झालेल्या बदलांचा आणि या वारशासमोरील आव्हानांचा वेध घेणार आहोत.Marathwada was once known for its thriving textile trade, world-renowned Paithani sarees, and rich culinary traditions. Today, however, traditional weaving communities face economic challenges while many local food traditions struggle to survive in a rapidly changing world. In this episode, we explore the rise of Marathwada’s textile heritage, the realities faced by artisans today, and how the region’s unique food culture is evolving amidst social and economic change.


