यश म्हणजे नेमकं काय? मोठी नोकरी, बँक बॅलन्स की मनाची शांती? आजच्या काळात यशाच्या व्याख्या इतक्या गुंतागुंतीच्या का झाल्या आहेत आणि आपण सतत काहीतरी मिळवूनही आपल्याला असमाधानी का वाटतं, यावर आपण या भागात सविस्तर चर्चा केली आहे. डॉ. नंदू मुलमुले (Senior Psychiatrist) यांच्याशी साधलेला हा संवाद यशाकडे पाहण्याचा तुमचा दृष्टिकोन बदलून टाकेल. सोशल मीडियाचा प्रभाव, कौटुंबिक अपेक्षा आणि 'Settled' असण्यामागचं खरं समाधान अशा अनेक महत्त्वाच्या पैलूंवर आम्ही प्रकाश टाकला आहे. यश हे एखादं ठिकाण नसून तो एक प्रवास कसा आहे, हे जाणून घेण्यासाठी हा एपिसोड नक्की पहा.What is the true definition of success? In this episode, Dr. Nandu Mulmule breaks down why we feel unfulfilled despite our achievements. We discuss the shift from stability to freedom, the guilt of balancing career and family, and how to define success on your own terms. And also about life lessons, success, and motivation, how to keep up with that. What is a Successful Life?


