EP 5 : फॅशन इंडस्ट्रीत पाय रोवून उभं राहणारी मराठमोळी मुलगी वैशाली

EP 5 : फॅशन इंडस्ट्रीत पाय रोवून उभं राहणारी मराठमोळी मुलगी वैशाली

वयाच्या सतराव्या वर्षी काहीतरी करायचं म्हणून घरातून पळून गेलेली एक मुलगी मुंबईत येते. अगदी ५००रुपये महिना पगारापासून काम सुरु करते आणि आजच्या घडीला फॅशन इंडस्ट्रीत वैशाली एस नावाचा मोठा ब्रँड उभारते. सारंच अविश्वसनीय.. मुंबई ते मिलान असा संघर्षमय प्रवास सांगतेय, पैठणी, गजरे, खण यांना रॅम्पवर पहिल्यांदा घेऊन येणारी मराठमोळी फॅशन डिझायनर वैशाली शदांगुळे.
सकाळ तनिष्का पॉडकास्टमध्ये तिच्याशी संवाद साधला आहे, स्वाती केतकर-पंडित यांनी.