Shrutakirti Marathi Introduction

Shrutakirti Marathi Introduction

श्रुतकीर्ती निर्मिती म्हणजे पॉडकास्ट निर्मिती. तुमच्या पॉडकास्टच्या निर्मितीसाठी आम्ही अथपासून इतिपर्यंत सेवा देतो. तुमचं काम लोकांपर्यंत पोचवण्याचं पॉडकास्ट हे सर्वात आधुनिक आणि प्रभावी माध्यम आहे – मग तो व्यवसाय-व्यापार असो, सामाजिक काम असो,...
श्रुतकीर्ती निर्मिती म्हणजे पॉडकास्ट निर्मिती. तुमच्या पॉडकास्टच्या निर्मितीसाठी आम्ही अथपासून इतिपर्यंत सेवा देतो. तुमचं काम लोकांपर्यंत पोचवण्याचं पॉडकास्ट हे सर्वात आधुनिक आणि प्रभावी माध्यम आहे – मग तो व्यवसाय-व्यापार असो, सामाजिक काम असो, प्रोफेशनल असो वा निव्वळ छंद असो.

तुमच्या पॉडकास्टचा विषय आणि आशय निश्चित झाला की बाकी सगळं श्रुतकीर्ती निर्मितीवर सोपवा – सत्रांचं नियोजन, ध्वनिमुद्रण, ध्वनिसंपादन, प्रसारण सगळं!

श्रुतकीर्ती निर्मितीच्या सेवेची तपशीलवार माहिती देणारा हा पॉडकास्ट. या भागात श्रुतकीर्तीच्या संस्थापक उज्ज्वला आणि विदुला ‘तुमच्या पॉडकास्टसाठी श्रुतकीर्ती’ या संकल्पनेची ओळख करून देत आहेत.



उज्ज्वला बर्वे (https://www.linkedin.com/in/ujjwala-barve-25387518/) माध्यमतज्ञ आहेत आणि मुद्रित माध्यमे, दूरचित्रवाणी आणि नभोवाणीवर काम करण्याचा त्यांचा प्रदीर्घ अनुभव आहे. विदुला टोकेकर (https://www.linkedin.com/in/vidula-tokekar-457b221b/) अनुभवी भाषांतरकार आहेत आणि भाषाविषयक सेवा देणाऱ्या ट्रान्सलेशनपॅनाशिया (www.panaceabpo.co.in) या संस्थेच्या संस्थापिका आणि संचालिका आहेत. या दोघींच्या रूपाने माध्यम, भाषा आणि व्यवसाय या तीन्हींमधील प्रभुत्व श्रुतकीर्तीला मिळालं आहे.

हा भाग तुम्हाला नक्कीच उपयुक्त वाटला असेल. श्रुतकीर्तीमुळे तुमचा पॉडकास्ट कसा अद्वितीय आणि परिणामकारक होतो हे जाणून घेण्यासाठी 9975579562 या क्रमांकावर मेसेज किंवा व्हॉट्सअॅप करा.
podcastindia,