देशातील बाजारात तुरीचे दर तेजीत आहेत. देशातील उत्पादन घटल्यानं बाजाराला आधार मिळत आहे. त्यामुळं केंद्र सराकरनं आयात करून पुरवठा वाढवण्याचं उद्दीष्ट ठेवलं. वर्षभरात १० लाख टन तूर आयात केली जाईल, असे केंद्रीय अन्न मंत्रालयाच्या सचिवांनी सांगितले. मग खरचं सरकारला एवढी तूर आयात करता येईल का? आफ्रिकेत तूर लागवड आणि पिकाची स्थिती काय आहे? याची माहिती तुम्हाला आजच्या शेतमार्केट पाॅडकास्टमधून मिळेल.