शेतकरी तूर कशी विकतात याची चर्चा सध्या बाजारात सुरु आहे. कापूस आणि सोयाबीनचे दर नरमल्यानंतर शेतकऱ्यांनी बाजारातील आवक कमी केली. परिणामी दरातील घसरण थांबली. पण शेतकरी तुरीचीही विक्री अशीच करतील का? यंदा तुरीला काय दर मिळू शकतो? याची माहिती तुम्हाला आजच्या मार्केट बुलेटीनमधून मिळेल.


