देशातील बाजारात सध्या गहू दरावरून मोठ्या घडामोडी घडत आहेत. सरकारनं ११ लाख ७२ हजार टन गहू विक्रीसाठी लिलाव केले. पण या लिलावात कमी व्यापाऱ्यांनी सहभाग घेतला होता. त्यामुळं केवळ ५ लाख टन गहू विकता आला. गव्हाचे भाव हमीभावापेक्षा कमी करण्याचे सरकारचे उद्दीष्ट आहे. मग खरंच सरकारला हे उद्दीष्ट गाठता येईल का? सध्या गव्हाला काय भाव मिळतोय? गव्हाचं उत्पादन यंदा वाढेल का? याची माहिती तुम्हाला आजच्या मार्केट बुलेटीनमधून मिळेल.


