सोयाबीनचे दर सध्या दबावात आहेत. बाजारात सोयाबीनची आवक सरासरीपेक्षा काहीशी अधिक आहे. त्यामुळे सोयाबीनचे दर कमी झाले आहेत. शेतकरी खरिपाच्या तोंडावर सोयाबीन विकत असल्याचे व्यापारी सांगत आहेत. भाव कमी होत असले तरी सोयाबीनची आवक वाढत आहे. त्यामुळे सोयाबीन दरावर आणखीनच दबाव येत आहे. मग पुढील काळात सोयाबीनचा बाजारभाव कसा राहील? सोयाबीनवरील दबाव दूर होईल का? याची माहिती तुम्हाला आजच्या शेतमार्केट पाॅडकास्टमधून मिळेल.


