दही, शिळी भाकरी आणि विविध चटण्या हा मेनू बघून अनेकांच्या तोंडाला पाणी सुटतं. याचं कारण हा साधा आहार असला तरी, तो सहजपणे उपलब्ध होत नाही. ही शेतकऱ्यांची न्याहरी आहे. ज्याच्याकडं किमान एकतरी दुभतं जनावर आहे, तोच याचा आनंद घेऊ शकतो.
Curd, chutney, and roti… is a delicious, mouth-watering menu. Although it is a simple diet, it is not readily available. This is the farmer's breakfast. One who owns at least one milch animal can enjoy it.