जागतिक पातळीवर मागील सात महिन्यांपासून काबुली हरभऱ्याची टंचाई आहे. काबुली हरभऱ्याने विक्रमी दराचा टप्पा गाठला होता. त्यामुळे चालू हंगामात काबुली हरभरा लागवडीत ३० टक्क्यांपर्यंत वाढ झाली. सहाजिकच लागवड वाढल्याने बंपर उत्पादन होईल, असा अंदाज होता. पण पावसाने मोठा फटका बसला. मग देशातील उत्पादन कसं राहील? आंतरराष्ट्रीय बाजारातील टंचाई किती काळ राहील? पुढील काळात काबुली हरभऱ्याचे भाव कसे राहतील? याची माहिती तुम्हाला आजच्या शेतमार्केट पाॅडकास्टमधून मिळेल.


