Chana Market: वादळी पावसाचा हरभरा उत्पादकतेला फटका | Agrowon
Shet MarketMarch 18, 202300:05:13

Chana Market: वादळी पावसाचा हरभरा उत्पादकतेला फटका | Agrowon

महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या दोन राज्यातच देशातील एकूण हरभरा लागवडीपैकी निम्मे क्षेत्र आहे. महाराष्ट्रात मराठवडा आणि विदर्भात हरभऱ्याखाली जास्त क्षेत्र आहे. राज्यात ५० टक्के हरभरा काढणी पूर्ण झाली असून जवळपास ५० टक्के हरभरा शेतातच आहे. मागील तीन दिवसांपासून राज्यातील महत्वाच्या हरभरा उत्पादक भागांमध्ये पाऊस होतोय. त्यामुळे हरभरा पिकाला मोठा फटका बसत असल्याचे शेतकरी सांगत आहेत. मग या परिस्थितीचा आधार हरभरा बाजाराला मिळेल का? सध्या हरभऱ्याला काय भाव मिळतोय? याची माहिती तुम्हाला आजच्या मार्केट बुलेटीनमधून मिळेल.