तुम्ही कधी राग न आवरून मुलांना मारलंय का ? नंतर त्यांचे केविलवाणे चेहेरे आठवून आणि रडण्याचे आवाज कानात घुमून ; तुम्हाला प्रचंड guilt आलाय का ? एखाद्या गोष्टीसाठी मुलांना बोलून, त्यांच्यावर चिडून झाल्यावर नंतर त्यात त्यांची काहीच चूक नव्हती आपण उगाच बोललो असा पश्चाताप तुम्ही अनुभवलाय का? मुलं आपलं ऐकत नाहीत अशी तुमची तक्रार असते का ? मुलं अचानक मोठी झालीयेत असा साक्षात्कार तुम्हालाही झालाय का? मग हे नक्की ऐका ... "सुजाण पालकाच्या लेखणीतून ..." - व्यवसायाने प्रथितयश ऑर्थोपेडिक डॉक्टर, ४ वेगवेगळ्या पुस्तकांचे लेखक, हौशी फोटोग्राफर आणि सगळ्यात महत्वाचं, स्वतःचं पालकत्व अतिशय संवेदनशीलपणे जगणारे आणि त्यात येत गेलेले अनुभव खूप तरलपणे शब्दांत मांडणारे; डॉ. अमित बिडवे !!! जाणून घेऊया,त्यांच्या पालकत्वाच्या प्रवासातले हे अनुभव..त्यांच्याच शब्दांत आणि सादर करतीये माझ्या आवाजात...तुमची होस्ट, शिल्पा !!!
डॉ अमितसारखेच तुमचेही काही अनुभव असतील , तुम्हालाही तुमचं स्वतःचं असं काही शेयर करावंसं वाटत असेल तर मला नक्की कळवा !!
Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices

!["सुजाण पालकाच्या लेखणीतून" with Dr. Amit Bidwe [Orthopaedic Surgeon & An Author]](https://images.beamly.com/fetch/https%3A%2F%2Fmegaphone.imgix.net%2Fpodcasts%2Fdf87837c-4008-11ef-b52d-cb9a9d7f8996%2Fimage%2Fc61556820d389092e180188fe0f2d899.jpg%3Fixlib%3Drails-4.3.1%26max-w%3D3000%26max-h%3D3000%26fit%3Dcrop%26auto%3Dformat%2Ccompress?w=365)
!["सुजाण पालकाच्या लेखणीतून" with Dr. Amit Bidwe [Orthopaedic Surgeon & An Author]](https://images.beamly.com/fetch/https%3A%2F%2Fmegaphone.imgix.net%2Fpodcasts%2Fdf87837c-4008-11ef-b52d-cb9a9d7f8996%2Fimage%2Fc61556820d389092e180188fe0f2d899.jpg%3Fixlib%3Drails-4.3.1%26max-w%3D3000%26max-h%3D3000%26fit%3Dcrop%26auto%3Dformat%2Ccompress?w=150)
