शिकणं म्हणजे काय ? मूल कसं शिकतं ? शिक्षण घेणं किंवा देणं या प्रक्रिया कशा असतात आणि कशा असाव्यात ? शिक्षणाची योग्य पद्धत कशी असावी ? अभ्यासाच्या ताणाचं नियोजन कसं करावं ? National Education Policy (NEP) मध्ये नक्की काय अपेक्षित आहे? शिक्षणाच्या वेगवेगळ्या पर्यायी व्यवस्था कोणत्या आणि त्या कशा पद्धतीने काम करतात ? अशा अनेक प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी; त्यावर मार्गदर्शन करण्यासाठी आणि त्याविषयी शास्त्रशुद्ध माहिती देण्यासाठी घेऊन येतेय; बालशिक्षण क्षेत्रात गेली अनेक वर्ष सखोल अभ्यास करून आशयविकसित करणाऱ्या , "सहज आणि मेंदू आधारित शिक्षण" या खूप महत्वाच्या विषयाची कास धरून सतत प्रयोगशील असणाऱ्या आणि त्यावर आधारित साहित्य-साधनांची ची निर्मिती करणाऱ्या शिक्षणतज्ज्ञ सुषमा ताई अर्थात सुषमा पाध्ये यांना !!! शिक्षक दिनाचं औचित्य साधून "शिकणं , शिक्षण आणि पद्धती" या त्रिसूत्री वर आधारीत असा अतिशय महत्वाचा विषय हाताळणारा आजचा आपला भाग आहे आणि यावर मार्गदर्शन करण्यासाठी लाभलेली व्यक्ती देखील एक हाडाची शिक्षिका च असणं हा दुग्धशर्करायोग आहे !!! आवर्जून ऐका आणि शेयर करायला विसरू नका..
Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices

![शिकणं, शिक्षण आणि पद्धती- सुषमा पाध्ये [Learning, Education & System]](https://images.beamly.com/fetch/https%3A%2F%2Fmegaphone.imgix.net%2Fpodcasts%2Fe23cd1ee-4008-11ef-b52d-87c5e640eeea%2Fimage%2Fc61556820d389092e180188fe0f2d899.jpg%3Fixlib%3Drails-4.3.1%26max-w%3D3000%26max-h%3D3000%26fit%3Dcrop%26auto%3Dformat%2Ccompress?w=365)
![शिकणं, शिक्षण आणि पद्धती- सुषमा पाध्ये [Learning, Education & System]](https://images.beamly.com/fetch/https%3A%2F%2Fmegaphone.imgix.net%2Fpodcasts%2Fe23cd1ee-4008-11ef-b52d-87c5e640eeea%2Fimage%2Fc61556820d389092e180188fe0f2d899.jpg%3Fixlib%3Drails-4.3.1%26max-w%3D3000%26max-h%3D3000%26fit%3Dcrop%26auto%3Dformat%2Ccompress?w=150)
