Sakal Unplugged With Maharashtra Shahir Actress Sana Shinde अंकुशला काका म्हणणाऱ्या सनाने सांगितला त्याच्यासोबत रोमॅंटिक सीन करतानाचा '' तो" अनुभव..

Sakal Unplugged With Maharashtra Shahir Actress Sana Shinde अंकुशला काका म्हणणाऱ्या सनाने सांगितला त्याच्यासोबत रोमॅंटिक सीन करतानाचा '' तो" अनुभव..

केदार शिंदे दिग्दर्शित 'महाराष्ट्र शाहीर' सिनेमातनं सना शिंदे मराठी सिनेइंडस्ट्रीत पदार्पण करतेय. सध्या या सिनेमातील तिच्यावर चित्रित झालेलं 'बहरला हा मधुमास असा..' हे गाणं सोशल मीडियावर भलतंच ट्रेन्डिंगला आलं आहे. सोशल मीडियावर या गाण्याच्या रील्सचा पाऊस पडतोय असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. सर्वसामान्यच नाही तर सेलिब्रिटी देखील या गाण्यावर ताल धरताना दिसत आहेत. सनाचा हा पहिलाच सिनेमा त्यातही थेट अंकुश चौधरीसोबत काम करण्याची संधी..लहानणापासून ज्याला आपण 'काका' म्हणत आलो त्याच्यासोबत सिनेमात रोमॅंटिक सीन शेअर करताना सनानं स्वतःला कसं तयार केलं.. तसंच 'बहरला हा मधुमास..' या गाण्याच्या हूकस्टेपमागची इंट्रेस्टिंग स्टोरी अशा अनेक गोष्टी नवोदित अभिनेत्री सना शिंदेनं 'ईसकाळ'शी मनमोकळ्या गप्पा मारत शेअर केल्या आहेत.