मालिका विश्वातून घराघरात पोहोचलेला अभिनेता चिन्मय उदगीकर आता निर्माता म्हणून आपल्या भेटीला आला आहे. कलर्स मराठी वरील 'योगयोगेश्वर जय शंकर' या मालिकेची निर्मिती त्याने केली आहे. चिन्मयने केवल मालिकाच नाही तर चित्रपट आणि वेबसिरिज मध्येही आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली आहे. ही मालिका होण्यामागे शंकर महाराजांची कृपया आहे असे चिन्मय मानतो. केवळ शंकर महाराजच नाही तर पंढरीच्या वारीशीही चिन्मयचे एक खास नाते आहे. शिवाय अभिनेता ते निर्माता होण्यापर्यंतचा प्रवास आणि मनोरंजन विश्वाविश्वातील अनेक गोष्टींवर चिन्मयने 'सकाळ अनप्लग' मध्ये दिलखुलास संवाद साधला आहे.


