राजकारण हा शक्यतांचा खेळ आहे. इथे कुणी कायमचा शत्रू नसतो आणि कोणी कायमचा मित्र नसतो. कोण कधी बाजू बदलेल हे सांगता येत नाही. त्यामुळे उपकार, सहकार्य याला राजकारणात मोठे महत्व असते. दक्षिण कोल्हापूर विधानसभा मतदारसंघात 2014 च्या निवडणुकीत असाच एक किस्सा घडला होता. त्याची राज्यभर चर्चा झाली होती.