बेधडक पण सहृदयी.....Life Story of Dr. Padmasinh Patil
"राज"कारण " RajkaranDecember 08, 202300:14:23

बेधडक पण सहृदयी.....Life Story of Dr. Padmasinh Patil

राज्याचे माजी गृहमंत्री, माजी पाटबंधारे मंत्री डॉक्टर पद्मसिंह पाटील. डॉक्टर साहेब या नावाने ते राज्यभरात परिचित आहेत. लौकिकार्थाने सिंहासारखी पराक्रमी प्रतिमा असणाऱ्या या नेत्याचं काळीज मात्र अत्यंत मायेनं भरलेलं आहे. वरून पाहिले तर अत्यंत कणखर, टणक वाटणाऱ्या डॉक्टर साहेबांचं मन तितकंच मृदू आहे. समृद्ध सामाजिक जाणिवांचा धनी, विकासाची दूरदृष्टी लाभलेल्या या नेत्यानं विविध खात्यांची मंत्रिपदं भूषवताना धाराशिवसारख्या दुष्काळी जिल्ह्याचं चित्र बदलून टाकलय.