सिंह आणि हुशार ससा

सिंह आणि हुशार ससा

कोण्याएका जंगलात भासुरक नावाचा एक सिंह राहात होता. तो ताकदवान असल्यामुळे रोज अनेक हरणं, ससे अशी जनावरं मारूनही तो शांत होत नसे. एके दिवशी जंगलातले सगळे पशू त्याच्या जवळ गेले आणि त्याला म्हणाले, "महाराज, या सगळ्या प्राण्यांना मारून काय फायदा? एका हरणानेही तुमची भूक भागेल. म्हणून तुम्ही आमच्याशी तह करा. आज पासून घरी बसल्याबसल्या तुमच्या भोजनाची सोय म्हणून रोज एक प्राणी पोच होईल. असं केल्यामुळे तुमची उपजीविका पण चालेल आणि आमचाही नाश नाही होणार." त्यांचं बोलणं ऐकून भासूरक म्हणाला, "हे तुम्ही अगदी योग्य सुचवलंत पण याद राखा, जर एखाद्या दिवशी माझ्या भोजनासाठी प्राणी इथे पोचला नाही तर मी तुम्हा सगळ्यांना खाऊन टाकेन. सगळे प्राणी म्हणाले, "तुमच्या मनाप्रमाणेच सगळं होईल." इतकं बोलून त्यांनी निरोप घेतला आणि ते प्राणी निर्भयपणे जंगलात राहू लागले. रोज दुपारी एक जीव सिंहाकडे पोचत होता. एके दिवशी सिंहाकडे जाण्याची पाळी सशाची होती. ससा मरणाच्या भयाने घाबरून हळूहळू चालत होता. चालताचालता तो सिंहाला ठार करून आपला जीव कशाप्रकारे वाचवता येईल त्याचा विचार करत होता. वाटेत त्याला एक विहीर लागली. त्याने त्यात वाकून पाहिलं तर त्याला विहिरीत आपलं प्रतिबिंब दिसलं. ते पाहून सशाला सिंहापासून सुटकेचा मार्ग सापडला. ससा हळूहळू चालत संध्याकाळी सिंहाकडे पोचला. भासूरक भुकेने व्याकुळ झाला होता आणि या छोट्याशा सशाला पाहून तो अधिक संतापला. तो सशावर गरजला, "अरे नीच... एक तर इतका छोटा आहेस आणि याला एवढा उशीर लावलास! याअपराधाची शिक्षा म्हणून आता तुला खाल्यावर सकाळी मी सगळ्या हरणांना खाऊन टाकणार. ससा अगदी दबक्या आवाजात म्हणाला, "महाराज, यात नं माझी चूक आहे नं इतर जनावरांची"

कोण्याएका जंगलात भासुरक नावाचा एक सिंह राहात होता. तो ताकदवान असल्यामुळे रोज अनेक हरणं, ससे अशी जनावरं मारूनही तो शांत होत नसे. एके दिवशी जंगलातले सगळे पशू त्याच्या जवळ गेले आणि त्याला म्हणाले, "महाराज, या सगळ्या प्राण्यांना मारून काय फायदा? एका हरणानेही तुमची भूक भागेल. म्हणून तुम्ही आमच्याशी तह करा. आज पासून घरी बसल्याबसल्या तुमच्या भोजनाची सोय म्हणून रोज एक प्राणी पोच होईल. असं केल्यामुळे तुमची उपजीविका पण चालेल आणि आमचाही नाश नाही होणार." 

त्यांचं बोलणं ऐकून भासूरक म्हणाला, "हे तुम्ही अगदी योग्य सुचवलंत पण याद राखा, जर एखाद्या दिवशी माझ्या भोजनासाठी प्राणी इथे पोचला नाही तर मी तुम्हा सगळ्यांना खाऊन टाकेन. सगळे प्राणी म्हणाले, "तुमच्या मनाप्रमाणेच सगळं होईल." इतकं बोलून त्यांनी निरोप घेतला आणि ते प्राणी निर्भयपणे जंगलात राहू लागले. रोज दुपारी एक जीव सिंहाकडे पोचत होता. 

एके दिवशी सिंहाकडे जाण्याची पाळी सशाची होती. ससा मरणाच्या भयाने घाबरून हळूहळू चालत होता. चालताचालता तो सिंहाला ठार करून आपला जीव कशाप्रकारे वाचवता येईल त्याचा विचार करत होता. वाटेत त्याला एक विहीर लागली. त्याने त्यात वाकून पाहिलं तर त्याला विहिरीत आपलं प्रतिबिंब दिसलं. ते पाहून सशाला सिंहापासून सुटकेचा मार्ग सापडला. 

ससा हळूहळू चालत संध्याकाळी सिंहाकडे पोचला. भासूरक भुकेने व्याकुळ झाला होता आणि या छोट्याशा सशाला पाहून तो अधिक संतापला. तो सशावर गरजला, "अरे नीच... एक तर इतका छोटा आहेस आणि याला एवढा उशीर लावलास! याअपराधाची शिक्षा म्हणून आता तुला खाल्यावर सकाळी मी सगळ्या हरणांना खाऊन टाकणार. 

ससा अगदी दबक्या आवाजात म्हणाला, "महाराज, यात नं माझी चूक आहे नं इतर जनावरांची"