लक्षअसतंमाझंच्या आजच्या पॉडकास्टमध्ये संपूर्ण महाराष्ट्रात भक्तिमय वातावरणात आज साजरी होणाऱ्या आषाढी एकादशी आणि कोरोनामुळे वारकर्यांच्या काय भावना असतील याविषयावर साम टीव्हीचे कार्यकारी संपादक प्रसन्न जोशी यांनी त्यांच्या भावना मांडल्या आहेत. लक्ष असतं माझं या आपल्या दैनंदिन कार्यक्रमात आपण दररोज घडणाऱ्या बातम्यांमधील महत्वाच्या विषयावर 'काहीतरी नवीन बातमीच्या पलीकडील' माहिती तुमच्यापर्यंत पोहचवत असतो. या कार्यक्रमातून साम टीव्हीचे कार्यकारी संपादक प्रसन्न जोशी दररोज समाजातील विविध विषयावर त्यांचे परखड मत मांडणार आहेत. तर दररोज ऐकायला विसरू नका - #लक्षअसतंमाझं


