Dhirubhai Ambani's character is inspiring and invigorating as he reaches the Everest of success by starting his own business only on the strength of perseverance when there is no business tradition or business education required to back him up in business. Dhirubhai set up his business empire in Mumbai, which in the beginning did not provide him with the jobs he needed to survive.
He started a new way of reducing the dependence of his business on others while starting one new business after another. The life story of Dhirubhai, who fulfilled all his dreams only on the strength of stubbornness, is very exciting and wonderful.You have to listen to Dhirubhai's podcast to understand the effort, the thought and the strong attitude that he had to put in to reach the heights he achieved. His ingenuity in involving ordinary middle class people in his success is also astounding. Dhirubhai was the one who paved the way for the middle-class to the riches of the stock market.

उद्योग-व्यवसायाची कुठलीही परंपरा नसताना किंवा उद्योगासाठी लागणारे व्यावसायिक शिक्षण नसताना केवळ जिद्दीच्या जोरावर आपला स्वत:चा उद्योग सुरू करून यशाचे एव्हरेस्ट गाठणारे धीरूभाई अंबानी यांचे चरित्र प्रेरक आणि स्फूर्तिदायक आहे. अगदी सुरूवातीला ज्या मुंबईने त्यांना जगण्यासाठी आवश्यक असणारे काम दिले नाही त्याच मुंबईत धीरूभाईंनी आपले उद्योगसाम्राज्य उभे केले. एकानंतर एक नवे उद्योग सुरू करताना आपल्या उद्योगांचे इतरांवरील अवलंबित्व कमी करण्याची एक नवी पद्धत त्यांनी सुरू केली. केवळ जिद्दीच्या जोरावर आपली सारी स्वप्ने पूर्ण करणार्याग धीरूभाईंची जीवनकथा खूप काही सांगणारी रोमांचक आणि अद्भुत आहे. शून्यातून श्विस उभे करताना करावे लागणारे प्रयत्न, त्यासाठी लागणारा विचार आणि खंबीर मनोवृत्ती हे समजून घेण्यासाठी धीरूभाईंचे पॉडकास्ट ऐकायलाच पाहिजे. आपल्या यशात सर्वसामान्य मध्यमवर्गीय लोकांना सामील करून घेण्याची त्यांची कल्पकताही थक्क करून सोडणारी आहे. सर्वसामानय मध्यमवर्गीय गुंतवणूकदाराला भांडवलदार करून श्रीमंत होण्याचा मार्ग उपलब्ध करून देणार्यां धीरूभाईंबाबत हे सारे समजून घ्यायलाच हवे.

IBCollective,Businessman,entrepreneur,Dhirajlal Ambani,